मुख्यमंत्री सन्मान प्राप्त प्रगतिशील शेतकरी देवराम बारी यांचा 90 वा वाढदिवस उत्साहात

443

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – शेंदुर्णी येथील प्रगतिशील शेतकरी मुख्यमंत्री सन्मान प्राप्त व शिक्षण प्रसारक मंडळ शेंदुर्णी या संस्थेचे अध्यक्ष देवराम मन्साराम बारी यांचा नववा वाढदिवस मित्रमंडळी व नातेवाईक यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला
यावेळी माझी जिल्हा परिषद सदस्य सागरमल जैन भाजपचे जेष्ठ नेते उत्तम थोरात मनोज बारी संपादक दैनिक देशोन्नती जळगाव अनिल चौधरी निळकंठ दुधे अमरावती प्रवीण गरुड व इतर मान्यवरांनी त्यांचा यशोचित सत्कार करून त्यांच्या सामाजिक उपक्रमाची माहिती यावेळी सांगितली
यावेळी गरजूविद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले रेखा बारी यांनी यावेळी कविता सादर करून बाल गोपालांनी सामूहिक नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली
यावेळी बोलताना प्रगतिशील शेतकरी देवराम बारी यांनी सांगितले की गावातून वाहणारे सांडपाणी एकत्र करून त्यावर मी शेती व फळबाग पिकवली माझ्या अशा अनेक उपक्रमाची आवृत्ती होत आहे याचा मनस्वी आनंद होतो
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक बारी राजेंद्र बारी, भूषण बारी आकाश बारी यांनी परिश्रम घेतले.