गरुड विद्यालय छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

64

 

शेंदुर्णी :- शेंदुर्णी ता.जामनेर द्वारा संचलित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा, न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक, पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण, आरक्षण, सामाजिक सुधारणा करून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अशा समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती. या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती देण्यात आली.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य एस.पी.उदार, उपमुख्याध्यापक शिंदे,पर्यवेक्षक जे.एस. जुंबळे विनोद पाटील सर्व प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.