आज आदर्श मुख्याध्यापक परदेशी सर हे प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होणार.

282

दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी ) लोहारा येथील डॉ.जे.जी.पंडित मा. विद्यालयाचे कर्तव्यदक्ष तसेच आदर्श मुख्याध्यापक श्री आर.एस. परदेशी हे दि.31.7.2023 रोजी त्याच्या या 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहे. त्यांच्या या उत्तम कार्याबद्दल आज दि.28 जुलै रोजी त्यांना आपण सर्व मान्यवर निरोप देणार आहोत..त्यासाठी आज विद्यालयाच्या भव्य पटांगणात त्यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दि.1.8.1992 रोजी त्यानी शिक्षक नोकरीची सुरुवात याच विद्यालयातून सुरू केली होती…आणि योगायोगाने ते याच विद्यालयात सेवानिवृत्त होत आहे.
त्यांच्या कार्यकाळात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम झाले आहेत.विद्यार्थी, पालक, समाज,आणि गाव याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले.अगदी निस्वार्थी भावनेने त्यांनी विद्यालयातील गोरगरीब विद्यार्थ्यांना नेहमीच मदत केली.तसेच स्काऊट-गाईडच्या शिबिरातून त्यांनी संस्कारक्षम पिढी घडवण्याचे कार्य केले आहे.
सरांनी या जवळपास दोन वर्षात विद्यालयाच्या प्रांगणात झाडे लावून त्यांना वाचवली आहे. कोरोना काळात त्यांनी न घाबरता विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य चालूच ठेवले होते. त्यांच्या कार्यकाळात संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत विद्यालयाने दिमाखदार कामगिरी केली आहे.
अत्यन्त दूरदृष्टी असलेले परदेशी सरांनी गावात,विद्यालयात,आणि विद्यार्थ्यांनमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. सर विद्यालयातील प्रत्येक सहकाऱ्यांसोबत नेहमी आदराने वागायचे..नेहमी भाऊ,दादा म्हणूनच हाक मारायचे…
त्यांच्या कार्यकाळात इ.10 विचा निकाल ही खूप चांगला लागला. आपल्याला शाळेसाठी काय नवीन करता येईल ,यासाठी सरांची नेहमीच धडपड असायची.देणगीदार व गेट टूगेदर सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याच्या कार्यकाळात भव्य असा हॉल तयार झाला आहे..आणि विशेष–त्या हॉलचे ही उदघाटन आजच होत आहे.

खूप केलंय सर आपण आमच्या गावच्या विद्यालयासाठी,त्यासाठी देणगी दारांचे पण मोलाचे सहकार्य लाभले.सरांनी दिलेल्या शब्दाला प्रत्येक देणगीदाराने सढळ हाताने मदत केली.सरांच्या हा कार्यकाळ लोहारा आणि परिसरातील गावांना कधीही न विसरण्या सारखा आहे..कार्यक्रमाच्या दिवशी ते आमंत्रित असतांना ही स्वतः फोन करून गावातील मान्यवरांना कार्यक्रमाला येण्यासाठी आग्रह करत.
एक होतकरू ,आदर्श,कर्तव्यदक्ष, प्रामाणिक,आणि नम्रतेच प्रतीक असणारे आमचे मुख्याध्यापक परदेशी सर हे आज सेवानिवृत्त होत आहे..यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.
म्हणतात ना!नोकरीत शेवटी सेवानिवृत्ती असतेच..आज ते त्यांच्या 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहे.
लोहारा वासीयाना सरांचे लाभलेलं हे जवळपास 2 वर्षांचा काळ, हा सुवर्णकाळ म्हणून विध्यार्थी, पालक,सहकारी हे नेहमीच लक्ष्यात ठेवतील!!
भावी जीवनासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा सर!!
✍️? दिनेश चौधरी, लोहारा.
(मेणगावकर ) 9881028027
9309918930