शेंदुर्णीसह परिसरात गांजा चे सेवन करणाऱ्या लोकांवर पोलिसांची करडी नजर , एका इसम वर कार्यवाही …

659

प्रतिनिधी शेंदुर्णी ता. जामनेर – पहूर – शेंदुर्णी पो. स्टे. हद्दीतील जंगीपुरा ता. जामनेर गावच्या नदीकाठी मोकळ्या जागेत एक इसम कसल्या तरी मादक पदार्थाचे सेवन करत आहे अशी पोलिसांना खात्रीशीर बातमी मिळाल्याने पहूर पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या सोबत शेंदुर्णी दूरक्षेत्र चे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील ,सहाय्यक फौजदार शशिकांत पाटील , पो. हे. कॉ. प्रशांत विरणारे , पो. कॉ. प्रशांत बडगुजर या पोलीस पथकाने दि. 28 जुलै 23 रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान घटना स्थळी छापा टाकून कातीराम हतांगळे वय – 25 रा. वाडीशेवाळा ता. पाचोरा ह. मु. शेंदुर्णी या इसमास रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे , यावेळी पंचा समक्ष कातीराम हतांगळे याने गांजा चे आमली पदार्थ सेवन केल्याचे कबूल व मान्य केले तसेच त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या कडे चिलम व माचीस पेटी मिळून आली सदर वस्तू ताब्यात घेऊन जागीच नष्ठ करण्यात आल्या आहे , त्यांनतर कातीराम हतांगळे याची प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्णी येथे तपासणी केली असता सदर इसम हा गांजा व आमली पदार्थ सेवन करणारा आहे असे आढळून आले म्हणून कातीराम हतांगळे विरुद्ध गुंगीकारक औषध द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम – 8 ( क ) कलम सह 27 अन्वये पहूर पो. स्टे. चे पो. कॉ. विजयकुमार पाटील यांच्या फिर्यादी वरून पुढील कारवाही करण्यात आली आहे ,

पहूर पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सदरची कारवाही केल्याने असे गांजा व आमली पदार्थ सेवन करणाऱ्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे तसेच यापुढे आता पोलीस अशा लोकांवर नजर ठेवणार असून त्यांच्या विरुद्ध कार्वाहीची मोहीम हाती घेतली आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे .