युवकांनी मतदार नोंदणी करावी , मतदानाचा पवित्र हक्क सर्वांनी बजावला पाहिजे – तहसीलदार नानासाहेब आगळे

160

प्रतिनिधी शेंदुर्णी ता. जामनेर 

अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरूड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी येथे दि. 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा होणारा महसूल साप्ताहानिमित्त नवीन मतदार नोंदणी व युवा संवाद कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. याकार्यक्रम प्रसंगी प्रमूख मार्गदर्शक
जामनेर तहसीलदार मा.श्री नानासाहेब आगळे यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले कि,आपल्या भारतीय राज्यघटने ने आपल्याला दिलेला मतदानाचा पवित्र हक्क सर्वांनी बजावला पाहिजे. महसूल सप्ताह निमित्त राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी युवकांनी योगदान देण्याचे सांगीतले.
युवकांनी सर्वप्रथम मतदार नोंदणी करावी असे आवाहन ही त्यांनी केले. यावेळी नवमतदारांचे मतदार फॉर्म भरून घेण्यात आले.
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो.डॉ. श्याम साळुंखे यांनी अध्यक्षीय मनोगतातून नवमतदारांना मतदान करण्याचे महत्त्व पटवून दिले.
या प्रसंगी प्रमूख अतिथी नायब तहसीलदार निवडणूक शाखा मा. श्रीमती चैताली दराडे, मंडळ अधिकारी श्री फड , तलाठी श्री नाईक, उपप्राचार्य प्रो. डॉ. संजय भोळे, उपप्राचार्य प्रा.अमर जावळे,उपप्राचार्य प्रा. अप्पा महाजन, उपप्राचार्य प्रा. प्रमोद सोनवणे, प्रो . डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. दिनेश पाटील तसेच नगरपंचायत कर्मचारी वृंद, शिक्षक, शिक्षकेतर वृंद तसेच विदयार्थी उपस्थीत होते, कार्यक्रमाचे नियोजन डॉ रोहिदास गवारे, डॉ योगिता चौधरी, डॉ. भूषण पाटील, डॉ. आजिनाथ जिवरग, प्रा दिपक पाटील, प्रा. वर्षा लोखंडे इ. केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ वसंत पतंगे यांनी तर आभार प्रा संदीप कुंभार यांनी केले.