शेंदुर्णीचे मंडळ अधिकारी महादेव फड यांचा उत्कृष्ठ मंडळ अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी तसेच मान्यवरांच्या हस्ते गौरव

411

शेंदुर्णी ता.जामनेर, प्रतिनिधी
महसुल विभागांतर्गत शासनाच्या विविध कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शेंदुर्णीचे मंडळ अधिकारी महादेव माणिक फड यांना उत्कृष्ठ मंडळ अधिकारी म्हणुन जळगांव चे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
एम.एम.फड हे सध्या शेंदुर्णीत कार्यरत असुन त्यांनी गौण खनिज संबंधित मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे.राजस्व अभियांतर्गत शिवरस्ते मोकळे करणे, ७/१२ संगणीकरण, ई चावडी वाचन उत्कृष्ठ कामकाज,आँनलाईन फेरफार मुदतीत प्रमाणित करणे, खातेदारांकडुन तलाठी यांना मदत करत वसुली पुर्ण करणे,अस्थापना संकलनाचे कामकाज सांभाळत इतर शासकीय कामात मदत करणे.
सन २०२२-२३ ई पीक पाहणी १०० टक्के खातेदारांना मार्गदर्शन करत शेतजमीन महसुल वसुली पुर्ण केली. ई चावडी अंतर्गत सर्व गावांचे १ ते.११ नमुने अद्ययावत केले आहे.
अशा विविध कार्याची शासनस्तरावर दखल घेत महसुल विभागाच्या वतीने एम.एम.फड यांचा सत्कार करण्यात येऊन गौरविण्यात आले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.