पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा शेंदूर्णी पत्रकार संघातर्फे निषेध

420

शेंदूर्णी प्रतिनिधी ,पाचोरा येथील पत्रकार ध्येय न्यूज संपादक संदीप महाजन यांना लोकप्रतिनिधी कडून फोनवरून धमक्या मिळाल्यावर आपल्या जीवितास धोका असल्याने त्यांनी पोलीस प्रशासनाकडे पोलीस संरक्षण मिळावे म्हणून मागणी केली होती त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्याचाच परिणाम म्हणून दिनांक ९/८/२०२३ बुधवार रोजी वृत्तांकन करून येत असतांना पाचोरा नगरपालिका समोर पत्रकार संदीप महाजन यांच्यावर तीन गावगुंडांनी हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली तसेच आमदार विरुद्ध बोलशील का म्हणून धमकावले या घटनेचा शेंदूर्णी शहर पत्रकार संघाचे वतीने तीव्र निषेध करत शेंदूर्णी पोलीस दुरक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांना निवेदन देण्यात आले निवेदनात घटनेतील हल्लेखोर गुंडावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी शेंदुर्णी येथील पत्रकार विलास अहिरे , ADV. देवेंद्र पारळकर , डॉ. निलम कुमार अग्रवाल ,  शेख हमीद , दिग्विजय सूर्यवंशी, प्रवीण कापुरे , दिपक जाधव ,योगेश सोनार , सुनील गुजर , युवराज गुजर , संतोष महाले , वाहेद अली आदी पत्रकार उपस्थित होते .