शेंदूर्णी मराठा कुणबी पाटील समाजसेवा बहुद्देशीय मंडळातर्फे गोंडगाव घटनेतील आरोपीला फाशीची मागणी

478

शेंदूर्णी प्रतिनिधी – येथिल मराठा कुणबी पाटील समाजसेवा बहुद्देशीय मंडळातर्फे गोंडगाव ता. भडगाव येथील ८ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून निघृन क्रुरहत्या करून प्रेत ३ दिवस लपवून ठेवले या अमानवीय क्रूर घटनेने जळगांव जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शेंदूर्णी येथे मराठा समाजातर्फे आज दिनांक ११/८/२३ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नावाने शेंदूर्णी पोलिस दुरक्षेत्रातील पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांना निवेदन देऊन सदर घटनेचा खटला जलद गती न्यायालयात चालविणे , प्रख्यात विधितज्ञ ऍड उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्याची तसेच सबळ व भक्कम पुराव्यांची जुळवणी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी समाज मंडळ सदस्यांसह मोठया संख्येने समाज बांधव व युवक उपस्थित होते. यावेळी समाज मंडळ अध्यक्ष विलास अहिरे व तुकाराम पाटील यांनी समाजाचा आक्रोश व तीव्र भावना शासनाच्या पर्यंत पोहचवाव्या अशी मागणी निवेदन देतांना केली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाचे वतीने निवेदन स्वीकारून मराठा समाजाच्या भावना वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन दिले निवेदनाच्या प्रतीवर मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी सह्या केल्या आहेत.