शेंदुर्णीत स्वातंत्र्य दिनानिमित्त आरोग्य शिबिर. माहेश्वरी महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम.

176

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी –  येथील माहेश्वरी समाज महिला मंडळाच्या वतीने नेत्ररोग तपासणी ठेवण्यात आली. त्यात शंभरहून अधिक रुग्णांनी त्याचा लाभ घेतला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्हा माहेश्वरी महिला मंडळाच्या मार्गदर्शनाखाली शेंदुर्णी माहेश्वरी महिला मंडळांनी मोफत नेत्र रोग निदान शिबिराचे आयोजन केले. नांदुरा येथील प्रख्यात माधवराव नारायण संस्थांच्या वतीने तज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली. त्यात अनेक गरजू वयोवृद्ध डोळ्यांच्या रुग्णांना त्याचा लाभ झाला.
राज इंद्र क्लिनिक मध्ये झालेल्या शिबिरात कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष सुमती नवाल ,सचिव मनीषा तोतला ,सहसचिव ललिता झवर, शेंदुर्णी नगरपंचायत च्या नगराध्यक्ष विजया खलसे, डॉ राजमल नवाल, डॉ अल्केश नवल, डॉ उर्मिला नवाल ,जयश्री झवर, उषा झवर, ज्योती काबरा, लीना झवर, उषा काबरा, ज्योती काबरा, पुनम झवर, शेंदुर्णी शहर डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य रुग्ण नागरिक मोठ्या संख्येने होते. शेंदुर्णी येथील माहेश्वरी महिला मंडळांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम घेऊन रुग्णांना सेवा दिल्याबद्दल शेंदुर्णी नगरीच्या नगराध्यक्ष विजयाताई खलसेसे यांनी त्यांचे यावेळी कौतुक केले.