गरुड विद्यालयात देशाचा ७७वा. ‘स्वातंत्र्य दिन’ मोठ्या उत्साहात साजरा ….

137

शेंदुर्णी-
आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी या ठिकाणी विद्यालयाच्या भव्य पटांगणावर देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात संपन्न झाला.
परकीय गुलामगिरी संपवून ब्रिटिशांच्या ताब्यातून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. गरुड विद्यालयातील राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड यांनी केले तर भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे ज्येष्ठ संचालक सागरमल जैन व पंचायत समिती सदस्य डॉक्टर किरण सूर्यवंशी यांनी केले. त्यानंतर विद्यालयातील एन सी सी व स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड, संस्थेचे ज्येष्ठ संचालक सागरमल जैन ,जिल्हा परिषद सदस्या सरोजनी ताई गरुड, पंचायत समिती सदस्य डॉक्टर किरण सूर्यवंशी , संस्थेचे सहसचिव दिपकराव गरुड सामाजिक कार्यकर्ते अमरीश गरुड ,माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर अण्णा बारी ,धीरज जैन , शेंदुर्णीच्या नगरसेविका श्रीमती चंद्रभागा माधव धनगर व नगरसेविका श्रीमती वृषाली गुजर ,रा दे निकम गुरुजी , सुनील डी गरुड, गजानन धनगर ,प्रभाकर सपकाळ , एस टी चौधरी,विठ्ठल गरुड ,विद्यालयाचे मुख्याध्यापक एस .पी .उदार, पत्रकार अतुल जहागीरदार ,दिग्विजय सूर्यवंशी, विलास आहेर, आनंदा धनगर ,रवी गुजर, फिरोज खाटीक , उपमुख्याध्यापक एस व्ही शिंदे, पर्यवेक्षक जे एस जुमडे व व्ही व्ही पाटील शेंदुर्णी नगरीतील ग्रामस्थ, पालक ,विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका ,प्राध्यापक, प्राध्यापिका, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक पी जी पाटील यांनी केले.