शेंदूर्णी नगरपंचायतचे करवाढी विरोधात शहर राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतर्फे सोमवारी महामोर्चाचे आयोजन

378

शेंदूर्णी प्रतिनिधी – येथील नगरपंचायत कडून सन २०२२/२३ चे मालमत्ता करात २०% करवाढ करण्यात आली असून कर विभागाकडून वसुली केली जात आहे तसेच सन २०२३ ते २०२६ या पुढील ४ वर्षा करीता नगर रचना विभाग मूल्यांकन अधिकारी व मुख्याधिकारी नगरपंचायत शेंदूर्णी कडून प्रचंड करवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. शेंदूर्णी नगरपंचायतने लागू केलेल्या व प्रस्तावित करवाढी विरोधात शेंदूर्णी शहर राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना(उबाठा) भा.राष्ट्रीय काँग्रेस मित्रपक्ष महाविकास आघाडीचे वतीने दिनांक २१/०८/२०२३ रोजी सकाळी ११ वा. नगरपंचायत कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर मोर्चा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून गोंधळपुरा , पारस पतसंस्था चौक,महावीर मार्गाने नगरपंचायत कार्यालयावर नेऊन करवाढ रद्द करणे व करवाढी वर हरकती घेण्यासाठी कराची थकबाकी भरण्याची अट रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे.तरी नागरिक बंधू,माता भगिनींनी सदर मोर्चात मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक शहर राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी मित्र पक्षाचे वतीने करण्यात आले आहे. शेंदूर्णी नगरपंचायतने सन २०२२/२३ मध्ये शहर बृहत आराखडा जाहीर करून गाव हद्दी जवळील २ किलोमीटर अंतरावरील शेत जमिनींवर आरक्षणे टाकली होती व मालमत्ता करांमध्येही २०% करवाढ केली होती तेव्हा ऑक्टोबर,नोव्हेंबर २०२२मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय गरूड यांचे नेतृत्वाखाली नागरिकांनी तर शेंदूर्णी शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तजय अग्रवाल यांचे नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी मोर्चे काढून शहर बृहत आराखडा व करवाढीस कडाडून विरोध करण्यात आला होता तेव्हा नगरपंचायत पदाधिकारी यांच्या तर्फे भाजप नेते गोविंद अग्रवाल यांनी सन २०२४ पर्यंत बृहत आराखडा मंजुरी व करवाढ करण्यात येणार नसल्याचे मोर्चेकरी नागरिकांना आश्वासन दिले होते तरीही मालमत्ता करात मोठया प्रमाणात वाढ करण्यात आली असल्याने नागरिकांमध्ये नगरपंचायत करवाढ विषयी प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.