राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे) गट,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडी पक्षातर्फे शेंदुर्णी नगर पंचायत वर महामोर्चा

193

प्रतिनिधी शेंदूर्णी, ता.जामनेर –
शेंदूर्णी नगरपंचायतने सन २०२२/२३ मध्ये केलेली व सन २०२३ ते २०२६ या पुढील ४ वर्षासाठी प्रस्तावित केलेली करवाढ व शहर बृहत आराखड्यात शेत जमिनीवर टाकलेले आरक्षण रद्द करणे साठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे) गट,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडी पक्षातर्फे शेंदुर्णी नगर पंचायत वर महामोर्चा काढण्यात आला , यावेळी
शेंदूर्णी शहरातील मालमत्ता धारक नागरिक व नगरपंचायत शहर बृहत आराखड्यात शेत जमिनीवर टाकलेले आरक्षण ग्रस्त शेतकरी दिनांक २१/०८/२०२३ रोजी आयोजित महामोर्चात उपस्थित राहून मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे ,

शेंदूर्णी नगरपंचायतने सन २०२२/२३ मध्ये मालमत्ता करात केलेली २०% करवाढ रद्द करावी तसेच शेंदूर्णी शहर बृहत आराखड्यात शहरा शेजारच्या २ किलोमीटर अंतरावरील शेत जमिनींवर टाकलेली वेगवेगळी आरक्षणे रद्द करावी या मागणीसाठी दिनांक ३१/१०/२०२२ रोजी शहर व्यापारी असोसिएशनने तर २/११/२०२२ रोजी शहर राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष आघाडीने शेंदूर्णी नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला होता. तेव्हा मोर्चाला सामोरे जाऊन नगरपंचायत पदाधिकारी व मुख्याधिकारी यांनी वरील मागण्यांची दखल घेऊन मासिक सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून करवाढ रद्द करण्याचे व नागरिकांचे सूचनेनुसार सुधारीत शहर बृहत आराखडा तयार करण्याचा ठराव मंजूर करणार असल्याचे आश्वासन उपस्थित मोर्चेकरी नागरिकांना दिले होते परंतु वरील आश्वासनाचा ठराव नगरपंचायत मासिक सभेत मंजूर न करता प्रशासनाने २०२२/२३ चे शहर बृहत आराखड्यास मंजुरी व २०% मालमत्ता करवाढ करून वसुलीस मंजुरी दिली हा नागरिकांचा विश्वासघात केला आहे.
तसेच सन २०२३ ते २०२६ या पुढील ४ वर्षासाठी पुन्हा प्रचंड करवाढ प्रस्तावित केली आहे.
सदर मोर्चाद्वारे आपणाकडे पुन्हा मागणी करण्यात येते की तत्कालीन शेंदूर्णी ग्रामपंचायत कार्यकाळात नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा व्यतिरिक्त नवनिर्मित शेंदूर्णी नगरपंचायत कडून शहरातील नागरिकांना कुठल्याही अतिरिक्त जास्तीच्या सोयी सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत तरीही नगरपंचायतने मागील पाच वर्षांत ४ वेळा मालमत्ता करात व पाणीपट्टी करात प्रचंड करवाढ करून त्याची आधीच वसुलीही केली आहे.
शेंदूर्णी नगरपंचायत क्षेत्रात कुठल्याही प्रकारचे उद्योग व्यवसाय नाही येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असून सद्या स्थितीत शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची असल्याची राज्य शासन व नगरपंचायत प्रशासनास पूर्ण कल्पना आहे. म्हणून
१) सन २०२२/२३ मध्ये मालमत्ता करात केलेली २०% करवाढ रद्द करावी
२) सन २०२३/२०२६ वर्षांसाठी प्रस्तावित केलेली करवाढ रद्द करावी.
३) २०२२/२३ मंजूर शहर बृहत आराखडा व शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवरील आरक्षण रद्द करावे.
४) नागरिकांच्या वैचारिक सभेच्या माध्यमातून नवीन शहर बृहत आराखडा तयार करण्यात यावा.
५) सन २०२३ ते २०२६ प्रस्तावित मालमत्ता कर यादी वेळेत सूचना फलकावर प्रसिद्ध केलेली नाही व सर्व मालमत्ता धारकांना कर बिले सुध्दा दिली नाही, नागरिकांना करवाढीवर हरकती घेण्या विषयी ध्वनी क्षेपकांवरून सूचना / माहिती देण्यात आलेली नसल्याने हरकती घेण्यासाठी पुन्हा नव्याने १ महिना मुदत वाढीची सुधारित जाहीर नोटीस प्रसिध्द करावी.
६) मालमत्ता कारवाढी विरोधात हरकती घेण्यासाठी थकीत व चालू मालमत्ता कर भरण्याची अट रद्द करावी.
७)महाराष्ट्र नगरपरिषदा,नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम,१९६५ कलम ११४,११५,११८,११९,१२० तील तरतुदीचे पूर्ण पालन करूनच भविष्यात मालमत्ता कर निर्धारन व्हावे.
८) नागरिकांना वेळेवर दैनंदिन मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. निवेदनाची प्रत मा. जिल्हाधिकारी जळगांव. व नगररचना अधिकारी जळगाव यांना दिली आहे .

सदर मोर्चा राष्ट्रवादीचे नेते संजय दादा गरुड  यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता सोबत   , सागरमलजी जैन, सुधाकर बारी, डॉ किरण सूर्यवंशी, शांताराम गुजर, स्नेहदीप गरुड, विलास अहिरे, खलील पठाण, मन्सूर पिंजारी, राजू पवार, संजय सूर्यवंशी, सुनील अग्रवाल, शे.लुकमान, सहदेव निकम, नंदू बारी, आनंदा धनगर, प्रदीप धनगर, जावा शेठ, अंबरीश गरुड, राजू धनगर, प्रसन्न फासे, दिलीप नाथ, आसिफ खलिफा, प्रवीण गरुड, धीरज जैन, योगेश गुजर, गजानन धनगर, अशोक बारी, जय हरी युवराज बारी, बारकु जाधव, विठ्ठल गरुड, नितीन शिवपुजे, राजू पाटील, आयुब मेंबर, तुकाराम पाटील, अशोक धनगर, कैलास शेठ काबरा, भूषण बडगुजर, विजय चौधरी, प्रवीण गुजर, सय्यद सलीम, अमृत धनगर, मुकेश पवार यांच्या सह शेकडो कार्यकर्ते व नागरिक      उपस्थित होते .