अंतर वाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा शेंदूर्णी मराठा समाजाकडून मुकमोर्चा द्वारे निषेध – गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या, दोषींवर कारवाई करा – मागणी

75


शेंदूर्णी प्रतिनिधी- जालना जिल्ह्यातील अंतर वाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शेंदूर्णी मराठा कुणबी पाटील समाजसेवा मंडळाचे वतीने आज दिनांक ३/९/२०२३ रोजी सकाळी १० वाजता मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.शेंदूर्णी पहुर दर्जा पासून मोर्चाला सुरवात करण्यात आली मोर्चाचे नेतृत्व समाजाचे जेष्ठ नेते,दगडू पाटील, संजय गरूड , उत्तम थोरात,डॉ.सागर गरूड,प्रफुल्ल पाटील, सीताराम पाटील,भागवत पाटील,सुनिल गरूड यांनी केले. मोर्चात जैन समाजाचे वतीने सागरमल जैन,बारी समाजाचे वतीने सुधाकर बारी,गुजर समाजाचे वतीने शांताराम गुजर तर तेली समाजाचे वतीने राजेंद्र पवार यांनी उपस्थित राहून मराठा समाजाचे आंदोलनास पाठिंबा दर्शविला.पहुर दर्जा पासून युनियन बँक,दत्त मंदिर चौक,गांधी चौक,महावीर मार्ग ,बस स्थानक मार्गे शेंदूर्णी पोलिस दुरक्षेत्रावर मोर्चा नेण्यात आला तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले,

त्यावेळी संजय गरूड,उत्तम थोरात,डॉ.सागर गरूड समाज मंडळ अध्यक्ष विलास अहिरे,उपाध्यक्ष निलेश थोरात यांनी जालना जिल्ह्यातील अंतर वाली सराटी येथे समाज बांधवांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचा तीव्र शब्दात निषेध केला यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावे पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांना निवेदन देण्यात आले निवेदनातून जालना जिल्ह्यातील लाठीमार घटनेची निवृत्त न्यायाधीशा मार्फत चौकशी करण्यात यावी,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामा घ्यावा,मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा तसेच मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या त्वरीत मार्गी लावाव्यात अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत मराठा समाज बांधवांच्या भावना शासना पर्यंत पोहचविण्याचे आश्वासन पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांनी मोर्चेकऱ्यांना दिले.मोर्चा शांततेत पार पडला.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील,संजय बनसोड, एएसआय शशिकांत पाटील,हेड कॉन्स्टेबल विरणारे, पाटील,बडगुजर, गायकवाड व अन्य पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता मोर्चा यशस्वी होण्यासाठी स्नेहदीप गरूड , सुरेश बगळे,मंगल बिल्होरे,संजय गोतमारे, संजय चिंचोले,अतुल पाटील,तुकाराम पाटील,भगवान बाविस्कर, राजेंद्र पाटील,विठ्ठल गरूड,शंकर गरूड,राहुल पाटील,सागर पाटील,सिद्धेश्वर पाटील,मनोज चव्हाण, प्रवीण गरूड ,शंतनु गरूड,धनंजय गरूड,प्रवीण पाटील, गणेश सोनवणे,सुनिल काळे,अक्षय पाटील,भय्या सुर्वे ,स्वप्नील पाटील व समाजातील सर्व युवकांनी मोठया प्रमाणावर सहभाग नोंदवला होता.