शाळांमधील भौतिक सुविधांची परिस्थिती पाहण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या पथकाने पाळधी गावतील जिल्हा परिषद शाळेत भेट

127

पाळधी ता. जामनेर – शाळांमधील भौतिक सुविधांची परिस्थिती पाहण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या पथकाने पाळधी गावतील जिल्हा परिषद शाळेत भेट देत तपासणी केली. यावेळी या समितीत जळगाव जिल्हा न्यायाधीश एस एन राजुरकर साहेब, तहसीलदार नानासाहेब आगळे साहेब, पहूर पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक सचिन सानप साहेब, गटशिक्षणाधिकारी राम लोहार साहेब, केंद्रप्रमुख बाबुराव धुंदाले उपस्थित होते. तसेच यावेळी शाळेतील सर्व परिसरात या समितीने भेट देत प्रत्यक्ष पाहणी करून मुलानं सोबत चर्चा केली. यावेळी शाळेत मिळणाऱ्या शालेय पोषण आहार, पिण्याचे पाणी, शैक्षणिक ज्ञानविषयी समितीने मुलांना प्रश्न विचारले.यावेळी गावातील मुलांच्या व मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य प्रा. ईश्वर चोरडिया सर , सागर बावस्कर, पोलिस पाटील प्रविण पाटील हे उपस्थित होते.यावेळी समितीसमोर शाळेतील समस्या विषयी प्रा.ईश्वर चोरडिया यांनी काही प्रश्न या समिती समोर मांडले. तर या बाबत समितीने शाळेतील समस्या विषयी लवकर वरती कळवून योग्य निर्णय घेऊन निरसन करण्यात येईल असे सांगितले.