चार कोटींच्या विकास कामांच्या श्रेयावरून राष्ट्रवादी भाजप आमने-सामने

260

प्रतिनिधी शेंदुर्णी ता. जामनेर – येथे विविध प्रभागांसाठी एकत्रित मिळून चार कोटींचा निधी नगरपंचायतीला प्राप्त झाला आहे, निधी आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नचे श्रेय घेण्यावरून शेंदुर्णीत राष्ट्रवादी व भाजप गट यांच्यात जुंपली आहे.
शेंदुर्णीत विविध प्रभागातील गटारी रस्ते व इतर विकास कामांसाठी चार कोटीचा निधी प्राप्त झाला असून सत्ता असो अथवा नसो शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असे बॅनर शेंदुर्णीत राष्ट्रवादीने झळकावले आहे.
त्याच्या प्रत्युत्तर दाखल शेंदुर्णीत नामदार गिरीश महाजन आले असता त्यांनी जाहीर सभेत सांगितले की राष्ट्रवादीची सत्ता नगरपंचायतीत नाही ,ग्रामपंचायतीत नाही, जिल्हा परिषदेत नाही मग यांचा निधी आणण्याचा संबंध काय ?
त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य संजयदादा गरुड यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन सदर चार कोटीचा निधी आणल्याचे कागदपत्रांचे पुरावे पत्रकारांसमोर सादर केले व सांगितले की ह्या निधी करता आम्ही सतत पाठपुरावा करीत होतो महाविकास आघाडीच्या काळात सदर काम मंजूर होऊन निधी उपलब्ध झालेला होता परंतु त्यात तांत्रिक दुरुस्ती करून वर्क ऑर्डर आता निघत आहे.

चार कोटी चे विकास कामांचा प्राप्त झालेला निधी खालील प्रमाणे
प्राध्यापक कॉलनी मध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते व गटार बांधकामा करतात तीस लाख शिवदत्त नगर मध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते व गटार बांधकाम 25 लाख, नामदेव नगर मध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते व गटार बांधकाम 40 लाख, प्रभाग क्रमांक एक मध्ये फेवर ब्लॉक बसवणे लाख ,संजय दादा नगर मध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते व गटार बांधकाम 25 लाख ,प्रभाग क्रमांक दोन मध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते बांधणे 15 लाख ,मदनी नगर मध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते व गटार बांधकाम दहा लाख ,शनी मंदिर खळवाडी भागामध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते व गटार बांधकाम 30 लाख 900 नगर ते पाचोरा रोड सरकारी दवाखान्यापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व गटार बांधकाम एक कोटी ,प्रभाग क्रमांक सात मध्ये फेवर ब्लॉक बसवणे व गटार बांधकाम दहा लाख ,एकता नगर भागामध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते गटार बांधकाम 30 लाख, कमलकिसन नगर भागामध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते गटार बांधकाम 30 लाख ,भास्कर नगर भागामध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते व गटार बांधकाम करणे 20 लाख ,प्रभाग क्रमांक 13 मध्ये फेवर ब्लॉक बसवणे व गटार बांधकाम करणे दहा लाख ,प्रभाग क्रमांक 14 मध्ये प्युअर ब्लॉक बसवणे व गटार बांधकाम 15 लाख असे एकूण चार कोटीचा निधी शेंदुर्णीत दहा आठ तेवीस च्या आदेशानुसार प्राप्त झालेला आहे.