जामनेर तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणूकीत नामदार गिरीश महाजन यांचाच डंका, 17 पैकी 17 ग्रामपंचायत सरपंच पदाचे भाजप चे उमेदवार विजयी

128

जामनेर (प्रतिनीधी)  तालुक्यांत 17 ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक तर पाच गावातील काही जागा साठी पोटनिवडणुकीचा निकाल समोर आला असुन ग्राम विकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांचाच डंका वाजला जवळपास सर्व ग्राम पंचायत मध्ये सरपंच पदाचे उमेदवार भाजप चे विजयी झाले तर सूनसगाव व वाकोद येथील पोटनिवडणुकीची एक एक जागा वगळता पोटनिवडणुकीत हि भाजपची सरशी झाली. सर्वात मोठया व चर्चेत असणाऱ्या पहूर पेठ मध्ये भाजपाच्या दिग्गज यांना पराभूत करीत राष्ट्रवादी ने 17 पैकी 11 जागा मिळवल्या राष्ट्रवादी चे माजी जिल्हा परीषद सभापती प्रदिप लोढा यांनी भाजप चे माजी जिल्हा परीषद सदस्य राजधर पांढरे यांना पराभूत केले तर विद्यमान सरपंच पती तथा भाजप पॅनल प्रमुख रामेश्वर पाटिल यांचाही दारुण पराभव झाला परंतु सरपंच पदासाठी भाजप उमेदवारांने बाजी मारली तर राष्ट्रवादी ला तिसऱ्या क्रमांकावर रहावे लागले सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांच्या पॅनल चे सरपंच पदाचे उमेदवार यांनी चांगली लढत भाजप उमेदवारा सोबत दिली.

दुसऱ्या क्रमांकाची दखल घेण्यासारखी मते त्यानी घेतली. नामदार महाजन हेचं ग्राम विकास मंत्री असल्याने निधीची अडचण येऊ नये म्हणून बहुतांशी ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी दोघी गट शिवसेना दोघे गट व काँग्रेस यांनी भाजपच्या एका गटाशी हातमिळवणी करीत त्यांच्या सोबत निवडून येण्यात धन्यता मानली. विजयी उमेदवार यांनी वाजत गाजत मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी विजयी मिरवणुक काढली तर नामदार महाजन यांनी विजयी उमेदवार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.