शेंदुर्णी येथे धनत्रयोदशीच्या निमित्ताने पुजन

148

शेंदुर्णी ता.जामनेर, प्रतिनिधी
दिवाळीच्या सणाच्या प्रारंभी शेंदुर्णी येथे सुप्रसिद्ध दंत रोग तज्ञ डॉ. भुषण गोपाळराव गरुड यांच्या दवाखान्यात धन्वंतरी देवीची पुजा करण्यात आली. दरवर्षी मोठ्या उत्साहात ही पुजा करण्यात येते.
डॉ. भुषण गरुड यांनी धन्वंतरी देवीची पुजा केली यावेळी डॉ. निलम अग्रवाल, डॉ. महेंद्र बोरसे, डॉ. यशवंत सुर्यवंशी, डॉ. मंगेश पाटील, डॉ. शोएब देशमुख, डॉ. अतुल पाटील, डॉ. देवानंद कुलकर्णी, डॉ. अल्केश नवाल,डॉ. अजय सुर्वे, डॉ. अमोल घोलप,डॉ. संदीप बारी,डॉ. स्वप्निल संघवी, डॉ. अमर बारी,डॉ. श्रीकांत दवंगे डॉ. निलेश पवार डॉ. दिनेश शुक्ला डॉ. चेतन अग्रवाल, डॉ. सतिष निंबाळकर डॉ. विजय राठोड डॉ. पृथ्वीराज पाटील, डॉ. भगवान बैरागी तसेच अकिलोद्दीन काझी व अँड. देवेंद्र पारळकर उपस्थित होते.
सगळ्यांना दिवाळीच्या निमित्ताने यावेळी सप्रेम भेट देण्यात आली.