पहूर पोलीस स्टेशनचे पो. उपनिरीक्षक अमोल गर्जे व पो. हे. कॉ. किरण शिंपी यांचे निलंबन पोलीस अधीक्षक यांची कारवाही

109

प्रतिनिधी जळगाव – गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडल्यानंतर कोणतीही कार्यवाही न करता ते वाहन सोडून दिल्याचा प्रकार दि. 16/10/2023 रोजी पहूर पोलिसांच्या हद्दीत घडला होता या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस  उपनिरीक्षक अमोल गर्जे व पो. हे. कॉ. किरण शिंपी यांना बुधवारी निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी काढले असून याबाबत चौकशी पोलीस उप अधीक्षक संदीप गावित करीत आहे . पहूर पोलीस स्टेशन च्या हद्दीतून गुटख्याची वाहतूक सुरु असल्याची माहिती पो. उपनिरीक्षक अमोल गर्जे व पो. हे. कॉ. किरण शिंपी यांना मिळाली होती . या माहिती नुसार दि. 16/10/2023 च्या रात्री पो. उपनिरीक्षक अमोल गर्जे व पो. हे. कॉ. किरण शिंपी यांनी एक वाहन पकडले होते . परंतु पो. उपनिरीक्षक अमोल गर्जे व पो. हे. कॉ. किरण शिंपी यांनी त्या वाहनावर कोणतीही कारवाही न करता सोडून दिले हा प्रकार पोलीस अधीक्षक यांच्या पर्यंत गेल्यावर त्यांनी चौकशी करून पहूर पोलीस स्टेशनचे पो. उपनिरीक्षक अमोल गर्जे व पो. हे. कॉ. किरण शिंपी यांच्यावर निलंबनची कारवाही केली आहे.