जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु होणाऱ्या या अन्नत्याग उपोषण अन्नत्याग करणारे आमच्या जमातीचे उपोषण करते श्री जगन्नाथ बाविस्कर श्री . नितीन कांडेलकर,श्री संजय कांडेलकर ,श्री. नितीन सपकाळे, श्री . पद्माकर कोळी स्वतंत्रचौक यामार्गाने उपोषणस्थळी पायी चालत दाखल

84

जळगाव – अन्नत्याग उपोषणचा आज ७ दिवस उलटत आहे तरीसुद्धा प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही त्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजता स्वातंत्र्य चौकापासून ते आकाशवाणी चौक तिथून उपोषण स्थळे थाडी नाद करत हजारो समाज बांधव व त्याचप्रमाणे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी घंटानाद व थाडीनाद करत शरातील लोकांचे लक्ष वेधले आहे व शासनाला चेतावणी सुद्धा दिली आहे आमच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत.
१) विनाअट आदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी ढोर कोळी महादेव कोळी मल्हार कोळी चे जातीचे दाखले कोळी नोंदी वरून सरसकट मिळावेत.
२) ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे.
३) जातपडताळणी समिती जळगाव जिल्हा करिता मंजूर आहे परंतु कार्यालय धुळे येथे आहे. कार्यालय कायमस्वरूपी जळगाव येथे करावे
४) आदिवासी कोळी समाजाच्या, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी स्वतंत्र महर्षि वाल्मीक ऋषी यांचे नावे महामंडळ स्थापन करावे.
५) अप्पर जिल्हाअधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जात पडताळणी समिती असावी.
६) तथाकथित आदिवासी संघटनांचा हस्तक्षेप थांबवावा.
७) बाहेरिल राज्यातील रहिवास्यांच्या जात वैधता रद्द कराव्यात.
८) टि एस पी क्षेत्रातील कोळी नोंदी प्रमाणे आम्हाला लाभ मिळावा.
९) आदिवासी कल्याण समितीतील आमदारांचा हस्तक्षेप थांबवावा.
१०) वादग्रस्त गोविंद गारे यांनी काढलेले अवैध परिपत्रक व शासन निर्णय रद्द करावा
वरिलप्रमाणे आमच्या न्याय व हक्कांच्या मागण्यासाठी आम्ही आमच्या मागण्य मान्य होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र अन्नत्याग सत्याग्रह/ ठिय्या आंदोलन / लाक्षणिक उपोषण / धरणे आंदोलन / जेलभरो आंदोलन करणार आहोत या सत्याग्रहात / आंदोलनात जमातीचे जिल्हा व बाहेरिल समाज संघटना अबालवृद्ध, महिलामंडळ, शालेय विद्यार्थी यांची हजारोंच्या उपस्थिती होते.