स्टेट बँक शेंदुर्णी शाखेची एटीएम सेवा कोलमडली ग्राहकांचे हाल.

141

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – येथे स्टेट बँकेचे एटीएम आहे. परंतु ते दिवसभरातून बऱ्याच वेळा बंद असल्याने ग्राहकांचे हाल होत असून एटीएम 24 तास सुरू असावे अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की भारत सरकारच्या महत्वकांक्षी योजनेतून रिझर्व बँक च्या निर्देशानुसार ग्राहकांच्या सोयी करता प्रत्येक गावात शहरात ठीक ठिकाणी एटीएम उघडण्यात आले .परंतु शेंदुर्णीतील स्टेट बँक चे एटीएम हे 24 तासातून जेमतेम पाच सहा तास सुरू असते .शेंदुर्णी ही बाजारपेठेचे शहर असून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात येते. त्यानिमित्ताने भाविक व बाजारहाटी करणाऱ्यांना तसेच दवाखान्या करता येणाऱ्यांची आवाजावी असते त्याकरता रोखपैसे लागल्यास एटीएम बंद असते तसेच नवीन एटीएम कार्ड आता प्रत्येक ग्राहकांना मिळत असून ते चालू करण्यासाठी एटीएम ला जावे लागते .परंतु ते बंद असल्याने एटीएम कार्डही सुरू होत नाही .त्या ठिकाणी इतरही कोणत्याही सुविधा नाही. तसेच सुरक्षा रक्षक ही कधीही तैनात नसतो. स्थानिक शाखा व्यवस्थापक त्याकडे लक्ष देत नसले तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन व्यवस्था व सुविधा सुरळीत करून द्यावी अशी मागणी त्रस्त ग्राहकांनी केली आहे.