झोपडी तांड्यात रविवारी रामदेव बाबा मंदिर व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा. दोन दिवस विविध धार्मिक उपक्रम साजरे होणार

78

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व परमपूज्य श्री श्याम चैतन्य बापूजी यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा.
शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी  – जामनेर तालुक्यातील शेवटचे गाव म्हणून ओळख असलेले व शेंदुर्णी पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील झोपडी तांडा गावात श्री रामदेवजी बाबा मंदिर व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात होणार आहे. सहभाग व उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शेंदुर्णी पासून जवळच असलेल्या झोपडी तांडा येथे रामदेवजी बाबा मंदिराचे काम पूर्ण झाले असून मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व परमपूज्य संत श्री श्याम चैतन्य जी बापू , सिताराम चव्हाण यांच्या शुभहस्ते होणार आहे. रविवारी सकाळी आठ ते 11 मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व त्यानंतर संध्याकाळपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्या अगोदर शनिवारी बारा वाजता कळस व मूर्ती मिरवणूक मोठ्या थाट माठात वाद्य वृंदासह पूर्ण तांड्यात मिरवणूक निघणार आहे.
सदर धार्मिक उपक्रमासाठी रामदेव बाबा भक्त व नागरिकांनी शनिवार व रविवार दोन दिवस चालणाऱ्या धार्मिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्या उपक्रमास सहभाग नोंदवावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन झोपडी तांडा व लिहा तांडा येथील ग्रामस्थ ,भाविक भक्तांनी केली आहे.