समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाजभुषण पुरस्कार जाहीर

343

लोहारा (दिनेश चौधरी )
जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध तरुण समाजसेवक
गजानन सिताराम क्षीरसागर यांना नुकतेचं शब्दगंध समुह प्रकाशन,औरंगाबाद कडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाजभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
गजानन क्षीरसागर यांच्या विविध समाजोपयोगी लोकांसाठी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात येत आहे,जळगाव जिल्ह्यात माणुसकी ग्रुप स्थापन करून निस्वार्थ सेवा करण्याकरता ते अग्रेसर आहेत, त्यांच्या या अनोख्या समाजसेवेचे तरुणांना प्रेरणादायी आहे ते म्हणतात “दुनिया मे आकर कमाया खूप हिरे-मोती मगर कफन मे जेब नही होती” या म्हणीप्रमाणे ते अहोरात्र दीनदुबळ्यांची गोरगरिबांची सेवा करत असतात लॉकडाऊन च्या कालावधीमध्ये त्यांनी गोरगरीबांना औषध मेडिकल जेवण आर्थिक मदत व बेवारस निराधारांची दाढी-कटिंग करून रुग्णालयात नेणे सैनिकांसाठी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येतो, , वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करणे,बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत घरी जाऊन सत्कार करणे, अशा कितीतरी सेवा कार्यांमध्ये अग्रेसर आहेत त्यांनी लॉक डाऊन च्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जळगाव जिल्ह्यात रक्तदान शिबिरे, मनोरुग्ण सेवा, अन्नधान्य वाटप, आरोग्य सेवा, हे कार्य करीत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती,व रक्तदान शिबिरे घेण्यासाठी जात असताना अपघात सुद्धा झाला होता , तरी ते खचले नाहीत, त्यांचे कार्य अजून जोमाने चालू आहे ,त्यांनी नुकताच तीन बेवारसमनोरुग्णांना येरवडा पुणे येथे आपल्या हक्काची जागा मिळवून दिली आहे.ह्या सर्व सामाजिक कार्याची दखल घेत शब्दगंध समुह प्रकाशन औरंगाबाद संस्थाचे अध्यक्ष मा श्री .संदिप दा. त्रिभुवन यांनी गजानन क्षीरसागर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाजभुषण पुरस्कार साठी निवड केली आहे.
संस्थाचे अध्यक्ष मा श्री संदीप दा. त्रिभुवन यांनी माझ्या कार्याची दखल घेत मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाजभुषण पुरस्कार साठी माझी निवड बद्दल मी त्यांचे मनापासुन आभारी आहे व मी माझे कर्तव्य करुन दिनदुबळ्याची मदत व पर्यावरण , सामाजिक कार्य सदैव करत राहील असल्याचे गजानन क्षीरसागर यांनी सागिंतले पुरस्कार स्वरुप सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र व शाल श्रीफळ देणार आहेत.
या पुरस्कारामुळे समाजात गजानन क्षीरसागर यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.त्यांचा हा १४ वा पुरस्कार आहे. या आधी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.