शिवसेना नेते तथा पत्रकार श्री गणेश पांढरे यांची शिवसेना जामनेर तालुका प्रवक्ते पदी निवड

270

लोहारा ( दिनेश चौधरी )
जामनेर तालुक्यातील पहूर येथील विद्यमान शिवसेना विभाग प्रमुख तथा दै. सामनाचे पत्रकार गणेश पांढरे यांची जामनेर विधानसभा शिवसेना प्रवक्ता पदी निवड करण्यात आली आहे.शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, राज्यसभा खासदार दैनिक सामना संपादक तथा प्रवक्ता संजयजी राऊत साहेब, जिल्हा संपर्क नेते विलासजी पारकर यांच्या आदेशाने जामनेर तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी जाहीर करण्यात आले. यात पहूर येथील गेल्या 35 वर्षापासून शिवसेनेची कमान सांभाळणारे निष्ठावंत शिवसैनिक तथा शिवसेना विभाग प्रमुख व दैनिक सामना’चे तालुका प्रतिनिधी गणेश पांढरे यांची शिवसेना तालुका प्रवक्ता पदी निवड करण्यात आली आहे.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील, सुकलाल शेट बारी, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील ,एडवोकेट भरत पवार ,आखील पत्रकार कल्याण बहुउद्देशिय संवस्थेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष दिनेश चौधरी, लोहारा.आदी पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.