शेंदुर्णीत मोकाट कुत्र्यांचा गँगवार : नगरपंचायतीने व्यान मागवावी

290

प्रतिनिधी शेंदुर्णी ता. जामनेर  – शेंदुर्णीत वाढती मोकाट कुत्र्यांची संख्या बघता नगरपंचायतीने व्यान बोलवून त्यांना बाहेर रवाना करावे ,अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
शेंदुर्णीत अगोदर 100 कुत्र्यांची एक मोकाट गॅंग होती. परंतु काही कारणास्तव त्यांचे विभाजन होऊन दोन गटात रूपांतर झाले. दोन्ही गट रस्त्याने येता जाता,आमना सामना झाल्यास तुंबळ युद्ध सुरू होते. रक्त बंबाळ होईपर्यंत युद्ध चालते. नागरिकांची मध्यस्ती ही त्यांना सहन होत नाही. अशावेळी पाद चारी , चालणारे लहान मुले भयभीत होतात.
रात्री बे रात्री कामावरून येणारा एखादा नागरिकाला कुत्रा दिसला व त्यांनी दगड जरी उचलले तरी कुत्रा बघतो ,त्याच्या भूकण्याच्या आवाजाने एक एक करून शेंदुर्णीतील सगळे कुत्रे त्याच्या समर्थनार्थ भुकायला लागतात. शहरातील भूकण्याचा आवाज एक दीड तास काही थांबत नाही.
मास खाण्याची सवय लागलेल्या, रक्ताने तोंड भरलेल्या कुत्र्यांना एखाद्या दिवशी मास नाही मिळाले तर ते जिवंत डुकरांची कच्ची बच्ची शोधतात, त्यांना सामूहिकपणे हेरतात व तुटून पडतात, जिवंत डुकर ची बच्ची मारताना व खाताना बघून नागरिकांना असय होते. त्यामुळे डुकरांची संख्या कमी झाली. परंतु पुढे ते माणसांवरही हल्ला करू शकतात. लहान बालकावर हल्ला केल्याची उदाहरणे आहेत. सकाळी पाच सहा वाजता ट्युशनला जाणाऱ्या मुलांपुढेही मोठी समस्या उभी राहिली आहे.
उदमाद ,दादागिरी करणारे ,धष्ट पोस्ट कुत्रे नगरपंचायतीने व्यान गाडीत कोंबून बाहेर पाठवावी, नागरिकांच्या जीविताला होणारा धोका टाळावा अशी मागणी त्रस्त नागरिकांनी यावेळी केली आहे.