शेंदुर्णीत शेतीच्या वादातून मुलाने केला बापाचा खून, आरोपी अटक

883

शेदुर्णी ता जामनेर..
येथिल तरंगवाडी शिवारात वाटणीच्या वादातुन मुलाने बापाच्या डोक्यात पावडे घालुन यमसदनी पाठविल्याची धक्कादायक घटना घडली असून आरोपी मुलगा अटक करण्यात आला आहे. आरोपीच्या मुलाने बापा विरोधात दिली फिर्याद.

सविस्तर वृत्त असे की, येथिल शेतकरी मयत नाना बडगुजर वय ८२ वर्ष हे सकाळच्या सुमारास शेतात कपाशी वेचत होते. ९ वा. सुमारास त्यांचा मुलगा आरोपी नामे कैलास नाना बडगुजर वय ५६ वर्षे हा शेतात आला आणि वडीलांसोबत वाटणी वरून वाद घालू लागला. वडीलांनी नकार दिला असता त्यांच्यात शाब्दीक वाद झाला आणि आरोपी कैलास याने वडील नाना बडगुजर यांच्या डोक्यात भुसा भरण्याच्या पावडयाने डोक्यात जोरात वार करताच नाना बडगुजर हे जागेवरच कोसळले.
आरोपीचा मुलगा आणि त्याची पत्नी शेतात काम करीत होते. विशाल याने डोक्यात वार केल्याचे बघताच धाव घेत आरोपी वडीलांच्या हातुन पावडे हिसकावून जखमी बाबांना सावरण्याचा प्रयत्न केला. ते कोणतीही हालचाल करीत नसल्याचे बघुन आरोपी याने शेतांमधुन पळ काढला परंतु काही तासात आरोपी ला पहूर पोलीस यांनी अटक केली आहे.

आणि संबधीत घटणेची माहिती वाऱ्या सारखी इतर शेतकऱ्यांना मिळताच त्यांनी घटना स्थळी धाव घेत पोलीसांना खबर दिली.

शेंदुर्णी दुरक्षेत्रचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, शशिकांत पाटील पोकाँ. प्रशांत विरनारे, शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत. मयत यांना पहुर ग्रामिण रुग्णालयात हलविले आणि घटना स्थळाचा पंचनामा करीत साहित्य ताब्यात घेतले.
सदर घटनेची फिर्याद आरोपीचा मुलगा विशाल कैलास बडगुजर वय ३३ याने दिलेल्या फिर्यादीवरून भादवी कलम ३०२ नुसार गुरं ४९१ / ३०२ नुसार पहुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शना खाली पीएसआय दिलीप पाटील करीत आहे.