शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधी – शेंदुर्णी शहर डॉक्टर असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी डॉ. प्राजक्ता निलेश पवार ,उपाध्यक्षपदी डॉ. सीमा निलेश शिंदे सहसचिव पदी डॉ. प्रियंका महेंद्र गीते( दंत रोग तज्ञ )यांची निवड बिनविरोध करण्यात आली.
बैठकीचे आयोजन डॉ. स्नेहल पाटील यांचे रुग्णालयात सीनियर प्रॅक्टिशनर डॉ. उर्मिला नवाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नीलमकुमार अग्रवाल यांच्या सूचने नुसार कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली .
यावेळी शेंदुर्णीतील महिला रुग्णांना कमीत कमी खर्चात आवश्यक तपासण्या व उपचारात सोयी सुविधा कशा देता येतील यावर चर्चा करण्यात आली. सोनोग्राफी केंद्र सुरू करणे ,रोग निदान शिबिरे ,कॅन्सर जनजागृती मोहीम ,योग प्राणायाम वर्ग महिला आरोग्य सशक्तीकरण, बाल संगोपन आदी आरोग्य विषयक उपक्रम नियमित राबवण्यावरही भर देण्यात आला.
यावेळी सदस्यपदी डॉ. उर्मिला नवाल ,डॉ. शुभदा बैरागी ,रश्मी पवार ,डॉ स्नेहल पाटील , डॉ .निकिता पाटील, डॉ.विजया घोलप, डॉ .वर्षा परदेशी ,डॉ प्रियंका गीते, डॉ . सीमा शिंदे , डॉ .प्राजक्ता पवार, डॉ. पूजा अग्रवाल, डॉ. हर्षदा गरुड ,डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. किरण वाघ , डॉ .मिना दामोदर, डॉ .दिपाली जोहरे, डॉ. प्रणिता भडांगे राहतिल.सदर निवडी बद्दल शेंदुर्णी नगरपंचायत च्या माजी नगराध्यक्ष विजया खलसे ,माजी उपनगराध्यक्ष चंदा अग्रवाल ,माजी जी.प. सदस्य सरोजिनी गरुड यांनी अभिनंदन केले.