लोहारा येथील विलास निकम सरांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

1410

लोहारा (दिनेश चौधरी ) पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील कन्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री विलास अरुण निकम हे लोहारा कन्या शाळेत मुलींच्या सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी एकच मिशन क्रुतीयुक्त शिक्षण,आजची स्वच्छ, विद्यार्थीनी, श्यामची आई पुस्तकाचे वाचन,शैक्षणिक साहित्य निर्मिती, विज्ञान प्रदर्शनात दरवर्षी सहभाग,मुलींची भाषणाची तयारीकरून विविध स्पर्धेत सहभाग,मतदान जागृतीसाठी पथनाट्य सादरीकरण, बेटी बचाव बेटी पढाओ ,तंबाकू मुक्त शाळा,ज्ञानरचनावाद शिक्षण, इ लर्निंग शिक्षण असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम कन्याशाळेत राबवित आहे.तसेच लोकसहभागातून शाळेचा भौतिक विकासासाठी प्रयत्न करीत आहे.सध्या कोरोना या साथीच्या आजारांमुळे शाळा बंद असून शिक्षण चालू आहे.श्री विलास अरुण निकम सरांनी मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी शिक्षण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मुलींना व्हाट्सअप द्वारे, मोबाईल द्वारे व प्रत्यक्ष भेटून अध्यापनाचे काम करीत आहेत.यामुळे मुलींची गुणवत्ता वाढीस मदत होत आहे.अध्यापना बरोबर ऑनलाइन पाढे पाठांतर ,ऑनलाइन सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, ऑनलाइन स्पेलिंग पाठांतर,ऑनलाइन भाषणा सारखे उपक्रम श्री विलास अरुण निकम सर राबवित आहे.पालकांनाही नेहमी संपर्क करून मुलींच्या शिक्षणाचे महत्व, व कोरोना आजाराचे प्रतिबंध उपाय बाबत जनजागृती करीत आहे.

यामुळे चाळीसगाव येथील बंजारा अस्तित्व फाउंडेशन तर्फे दिला जाणारा महाराष्ट्रातील प्रतिष्ठित समजला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून तो पुरस्कार पाच सप्टेंबर शिक्षक दिनी दिला जाणार आहे असे बंजारा अस्तित्व फाऊंडेशन चे अध्यक्ष श्रीअशोक गणेश राठोड सरांनी निवड पत्र त्यांना पाठवले आहे.पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंचायत समिती सदस्या सौ अनिता ताई चौधरी,लोहारा शहर पत्रकार मंच, शाळा व्यस्थापन समिती चे अध्यक्ष श्री शरद देशमुख सरांनी शाळेत येऊन सरांचे स्वागत व अभिनंदन केले.तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री विकास पाटील साहेब लोहारा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री बाबुराव धुंदाळे साहेब ,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती साळी मॅडम यांनी अभिनंदन व कौतुक केले.