त्या पीडित अल्पवयीन मुली साठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव कडे आर्थिक मदतीसाठी अर्ज सादर

248

प्रतिनिधी जळगाव – जळगांव येथील त्या पीडित अल्पवयीन मुली साठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव कडे आर्थिक मदतीसाठी अर्ज सादर तांबापुर झोपडपट्टीत राहत असलेली अल्पवयीन मुलीला धुणी भांडी घासत असताना तिला इतरांच्या घरातून पळविले होते व दुसऱ्या दिवशी त्या अल्पवयीन मुलीचे मृत शरीर मेहरूण तलावात मिळाले होते .
त्या इसमा विरुद्ध भा द वि ३६३ अन्वये दिनांक १९-७-२० रोजी रामानंद नगर पो स्टे ला गुन्हा दाखल झाला होता व त्यास अटक सुद्धा करण्यात आली होती.फारुक शेख व इतरांचा सु संवादाने अतिरिक्त वाढिव कलम लावण्यात आले
चौकशी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास एम राऊत यांच्याशी मन्यार बिरादरीचे फारूक शेख ,पीडिता चे नातेवाईक तसेच वेळोवेळी इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी संपर्क साधून योग्य ते पुरावे जमा करून दिल्याने व चौकशी अधिकारी व पो नि अनिल बडगुजर यांची सुद्धा खात्री झाल्याने दि २३-८-२० रोजी त्या गुन्ह्यात वाढिव कलम लावण्यात आले व त्यानुसार ३७६,३०५,३२३ सह बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४,५,६,८ व १२ कलम लावण्यात आले.
जिल्हा विधि सेवा प्राधिकरण कडे अर्ज ..
पीडिता ही अल्पवयीन असल्याने तसेच तिच्यासोबत अत्याचार झाल्याचे पी एम नोट्स कॉलम १५ वरून सिद्ध झाल्याने तिला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव मार्फत आर्थिक मदत करण्यासाठी रामानंदनगर पोलिस स्टेशनचे चौकशी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची मणियार बिरदारीचे अध्यक्ष फारूक शेख, पीडिताची आई सुफीया शाह, वडील भिकन शाह, मामा आसिफ शाह,सामाजिक कार्यकर्ते अनिस शाह,आसिफ शाह, यांनी सपोनि राऊत यांची भेट घेऊन आवश्यक ते कागदपत्रे सादर केली व त्यात काही कागदपत्रांची पूर्तता पोलीस स्टेशन मार्फत करून ते प्रकरण जिल्हा विधि केंद्रास पाठवण्याची ची विनंती करण्यात आली असता चौकशी अधिकारी राऊत यांनी त्यास त्वरित मान्यता दिली अशाप्रकारे त्या मृत पिडीतेच्या पालकांना आर्थिक सहकार्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव मार्फत लवकरच उपलब्ध होईल अशी आशा सपोनि राऊत व फारुक शेख यांनी व्यक्त केली,सपोनि सुहास राऊत यांच्याशी चर्चा करताना व कागदपत्र सादर करताना फारुक शेख ,सुफिया शाह,आसिफ शाह व भिकन शाह दिसत आहे .