शेंदुर्णी, चिलगाव शिवारात गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर पहुर पो. स्टे. चे कर्तव्यदक्ष अधिकारी राकेशसिंग परदेशी यांची धडक कारवाई

369

पहूर पोलिस ठाणे अंतर्गत अशी धडक कारवाई सुरू राहणार.. 
प्रतिनिधी पहूर ता. जामनेर – 
जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस ठाणे अंतर्गत शेंदुर्णी व चिलगाव शिवारात गावठी दारू हातभट्टी अड्ड्यावर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसापासून अवैध धंदे विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे आज सकाळी शेंदुर्णी येथील हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकून यात आरोपी गणेश सुकलाल कोळी यांच्याकडून हात भट्टी बनवण्याचे कच्चे रसायन दहा हजार लिटर तसेच पाच टाक्या गावठी हातभट्टी दारू असे पंधरा हजार किमतीचे हातभट्टी दारू चामाल सॅम्पल घेऊन जागीच नष्ट करण्यात आला असून तसेच चिलगाव शिवारातील हातभट्टी दारू विक्रीच्या टाकून आरोपी हुसेन सरदार तडवी यांच्याकडून सहाशे लिटर कच्चे रसायन तीन टाक्या असे सात हजार रुपये किमतीचा रसायन जागीच नष्ट करण्यात आले आहे.

पहूर पोलिस ठाणे अंतर्गत अवैध धंदे विरोधात पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश सिंग परदेशी व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र परदेशी ज्ञानेश्वर ठाकरे या पथकाने ही कारवाई केली असून अवैध धंद्या विरोधात अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश परदेशी यांनी कळवले आहे पहूर शहरात कोरोना आजार होऊ नये म्हणून संध्याकाळी सात वाजे तर संपूर्ण दुकाने प्रतिष्ठाने व कार्यालय बंद करण्यात येत आहे नागरिकांनी तोंडाला मास बांधावे विनाकारण घराच्या बाहेर पडू नये असे आव्हान पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांनी केले आहे.