पाचोरा : अंतुर्ली येथे निवडणूकीच्या वादातून दोन गटात हाणामारी, परस्परविरुध्द गुन्हा दाखल

421

 

प्रतिनिधी पाचोरा –    पाचोरा तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून आ.किशोर पाटील यांच्या मूळगावी अंतुर्ली बुद्रुक प्र पा येथे दिनांक १६ जानेवारी शनिवारी परस्पर दोन गटात झालेल्या मारहाणीच्या घटनेत एकूण १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, मतदानाच्या चिठ्या वाटपाच्या कारणावरून गुरुवारी झालेल्या मतदान प्रक्रियेवेळी परस्पर दोन गटात हाणामारी होऊन शिवीगाळ धक्काबुक्की चापट बुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद पंकज प्रकाश पाटील वय २१ राहणार अंतुर्ली बुद्रुक यांनी केली असून यात ग्रामपंचायत निवडणुकीतील वार्ड क्रमांक ३ मधील उमेदवार भूषण साहेबराव पाटील यांचेसह त्यांचे वडील साहेबराव राजाराम पाटील यांच्यासह सचिन रामदास पाटील, अजय सुरेश पाटील,प्रवीण भगवान पाटील,सागर विठ्ठल पाटील, लक्ष्मण दशरथ पाटील,भरत सुरेश पाटील अक्षय रघुनाथ पाटील ,भैय्या विक्रम पाटील भैय्या धनराज पाटील सर्व राहणार अंतुर्ली बुद्रुक तालुका पाचोरा अशा एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. येथील रहिवासी असून त्यांच्याविरुद्ध भादवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ ते १ चे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर परस्पर विरोधी गुन्ह्यात अजय सुरेश पाटील यांचे फिर्यादी वरून पृथ्वीराज आबा राजपूत, दिलीप देविदास राजपूत, जयपाल दिलीप राजपूत, शिवदास नामदेव देवरे यांचे विरुद्ध ३२३,५०४,५०६,व ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत म्हटल्या प्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारास मदत करण्याच्या कारणावरून फिर्यादिस शिवीगाळ करून चापटा बुक्यांनी मारहाण करून दुखापत करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांचे मार्गदशनखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल हंसराज मोरे हे करत आहेत दरम्यान येथील ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक ३ मध्ये आमदार किशोर पाटील यांचे काका विजय भीमसिंग राजपूत यांचे विरुद्ध भूषण साहेबराव पाटील अशी लढत झाली आहे. सोमवारच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.