औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न

259

 

प्रतिनिधी औरंगाबाद – समाजसेवक सुमित पंडित व गजानन क्षीरसागर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र ,शाल,ट्रॉफी व पुस्तक प्रदान ,
शब्दगंध समूह प्रकाशन औरंगाबाद मार्फत आयोजित कार्यक्रमात समाजसेवक सुमित पंडित व गजानन क्षिरसागर यांना सामाजिक, मानव अधीकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्या बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार 2020 देऊन गुणगौरव करण्यात आला.यात कला, क्रीडा,साहित्य, शैक्षणिक, सामाजिक,अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रक्तदान शिबिरे. मनोरुग्ण सेवा, बेटी बचाव बेटी पढाव, कोरोना काळात केलेले अतुलनीय कार्य, व करत असलेले निस्वार्थ सेवा यामुळे हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. ह्या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ व आकर्षक प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सुमित पंडित यांचा हा ५७ वा पुरस्कार होता व गजानन क्षीरसागर यांना १४ पुरस्काराने सन्मानित करन्यात आले आहे.या पुरस्कारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गजानन व सुमित यांचे कौतुक होत आहे.