वेरूळ येथे विविध पँनलांच्या प्रचाराचे वाजले बिगुल,कार्यकर्ते व मतदारांची तूफान गर्दी

227

 वेरूळ येथील शिवालय विकास पँनल व शादावल बाबा परिवर्तन पँनल तसेच आदर्श ग्रामविकास पँनलाचे प्रचाराचे शुभारंभ.

खुलताबाद / प्रतिनिधी

खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे शुक्रवारी श्री हरीहर विठ्ठल मंदिर येथे नारळ फोडून वेरूळ येथील प्रभाग क्र 1 मधून शिवालय पँनलचे उमेदवार कुणाल शंकर दांडगे,सुरेश विश्वनाथ नाना ठाकरे,सौ.ज्योती चंद्रकला भालेराव तसेच प्रभाग क्र.3 मधून आदर्श विकास पँनलचे उमेदवार विजय सखाराम भालेराव,मीनाक्षी राहुल निकुंभ,संगीता किशोर काळे,प्रभाग 3 मधूनच शादावल बाबा विकास परिवर्तन पँनलने प्रचाराचे शुभारंभ केले.तसेच वेरूळ येथील सर्वच पँनलाच्या वतीने नारळ फोडून प्रचाराची सुरुवात झाली.यावेळी मतदारांनी प्रचंड गर्दी केली होती. ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन नगरी असल्यामुळे वेरूळ ग्रामपंचायत हाती घेण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरु आहे.15 सदस्य असणारी मोठी ग्रामपंचायत आहे.या ठिकाणी तीन पँनलामध्ये सरळ लढत होत असुन पँनल बनवून सत्ता स्थापन करण्याचे सपने ज्येष्ठ,आजी माजी सदस्यांनी आदर्श ग्रामविकास पँनलाच्या 9 उमेदवारांनी श्री घृष्णेश्वर मंदिरात शुक्रवारी नारळ फोडून दंड थोपटले आहे.वेरूळ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तीन पँनल रिंगणात उतरलेले असुन एक पँनल शिवालय ग्रामविकास या नावाने तर दूसरा पँनल शादावल बाबा परिवर्तन पँनल तर आदर्श विकास पँनल असे तीन पँनल आपले नशीब आजमवत असुन ही “काटे की टककर” याप्रमाने लढत होण्याची चर्चा चौका चौकात चालू आहे.परंतु जनता जनार्दन मतदार हे निश्चितच यावर्षी कोणत्या पँनलाला कॉल देऊन भरघोस मतदान देईन हे येत्या 18 जानेवारीला ही स्पष्ट होणार आहे.

गावातील शादावल बाबा परिवर्तन पँनलचे उमेदवार अंकुश बंडू कणसे,शेख रिहाना मासियोद्दीन सौदागर,अनिता साहेबराव पांडव या पँनलानी देखील आपल्या प्रचाराचे नारळ फोडून मुसंडी मारली आहे.यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसह उमेदवार बांधव व प्रभाग क्र 3 चे शेकडो नागरिकांची उपस्तिथी होती.