जळगाव : मागील वर्षेभरात दोन कोटींचा मुद्देमाल जप्त1351 गुन्ह्यांची नोंद, 553 आरोपींना अटक

204

 

जळगाव प्रतिनिधी  –  वर्षेभरात जानेवारी ते डिसेंबर 2020 या कालावधीत अवैध मद्य विक्री विरोधात राबविण्यात आलेल्या धडक कारवाईत एक कोटी अठ्याण्णव लाख एकोणतीस हजार एकतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती सीमा झावरे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव यांनी दिली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कालावधीत एकूण 1351 गुन्हे नोंदविलेले असुन यामध्ये वारस-539 बेवारस-812 गुन्हे दाखल करण्यात आले असून यात 553 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मोहाफुले-100 किलो, हातभट्टी दारु 18173 लि, देशी मद्य- 1103.09 ब.लि., विदेशी मद्य-1807.3 ब.लि., बीअर 109.29 ब.लि. तसेच बनावट देशी मद्य-423.36 ब.लि. बनावट विदेशी मद्य-25.9 ब.लि., परराज्यातील मद्य-9.75 ब.लि., बनावट ताडी 561 लिटरचा समावेश आहे. यात 55 दुचाकी व 6 चारचाकी वाहनांचाही समावेश असून वर्षेभरात 1 कोटी 98 लाख 29 हजार 31 इतक्या रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ग्रामपंचायत निवडणूक काळात 34 गुन्ह्यांची नोंद तर 19 आरोपींना अटक त्याचबरोबर जिल्ह्यात सुरु असलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळातही विभागाने 1 ते 13 जानेवारी, 2021 या 13 दिवसांमध्ये एकूण 34 गुन्हे नोंदविले असुन यात वारस-14, बेवारस-20 गुन्हे दाखल करण्यात आले असुन यामध्ये एकूण 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे.