गोविंदभाई अग्रवाल यांच्या वाढदिवस निमित्त शेंदुर्णीत सात कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा

424

शेख हमीद – शेंदुर्णी येथे आज विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा होणार आहे,
शेंदुर्णी येथील भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज विविध ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा होणार असल्याचे नगराध्यक्ष विजयाताई कलसे यांनी सांगितले आहे. शेंदुर्णीला सोन नदी किनारी असलेली साडेचार कोटीची संरक्षण भिंत, त्यानंतर सात उंबर मंदिराकडे जाणारा नदीवरील पूल, जुना मोराड नदीवरील पूल,खळवाडितिल नदीवरील पूल, गावातील विविध चौक सुशोभीकरण, रस्त्यावर फेवर ब्लॉग बसविणे तसेच विविध नागरी वसाहतीतील रस्त्यांचे सिमेंटीकरण कॉंक्रिटीकरण कामांचे लोकार्पण सोहळा आज सकाळी दहा वाजता गोविंद अग्रवाल व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे,
त्याच प्रमाणे कब्रस्तान रोडच्या नदीवरील पुलाचे भूमिपूजन, वाडी दरवाजा ते आठवडे बाजार नदीवरील पुलाचे भूमिपूजन ,खळवाडी तील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण, गोपाळ पुरी रस्त्याचे काँक्रिटीकरण, नुरानी मजीत ते विज देवळी रस्त्यात फेवर ब्लॉक बसविणे, कुमावत गल्ली ,कुंभार गल्ली,बाबासाहेब आंबेडकर पुतळा रोड रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा होणार आहे.