जमात ए इस्लामीचे अंधारातून प्रकाशाकडे राज्यव्यापी अभियानाला होणार सुरवात

251

 

खुलताबाद /प्रतिनिधी

अध्यात्मिकतेच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याच्या उद्देशाने जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र यांच्या वतीने अंधारातून प्रकाशाकडे या संदेशाने राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा संकल्प हाती घेतला असून हे राज्यव्यापी अभियान १० दिवस चालणार या अभियानाचा तालुक्या भरातील नागरिकांना फायदा घ्यावा असी माहिती जमाअते इस्लामी च्या संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली

जमाअते इस्लामी हिंद च्या वतीने मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता शहरातील आजमझाहीपुरा येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत जमाती हिंदचे खुलताबाद शाखा अध्यक्ष नवशाद खान संयोजक शेख इस्माईल तसेच अब्दुल कदिरभाई. मोहम्मद एजाजभाई. मोहम्मद जीयाओद्दीन. मोहमद इरफान. जुबेर अब्दुला उमेर यांची उपस्थिती होती

जमाती हिंदचे पदाधिकारी माहिती देताना म्हणाले २२ जानेवारी पासून अंधारातून प्रकाशाकडे या राज्यव्यापी अभियानाला सुरवात होणार हे अभियान १० दिवस चालणार असून आम्ही या दहा दिवसात महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे लोकांना सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी, एकोप्याची भावना रुजावी असा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
समाजात एकोपा निर्माण व्हावा या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन या दरम्यान करण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रम हे कोरोनाचे शासकीय नियम पाळून केले जातील, असी माहिती आयोजकांनी या वेळी दिली आहे.मुख्य कार्यक्रम २२ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अंधारातून प्रकाशाकडे ही इस्लाम धर्माची शिकवण असून या कार्याक्रमात सर्व जाती-धर्मातील लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शहर शाखा प्रमुख नौशाद खान यांनी केले आहे.या शिवाय, मस्जिद परिचय आणि कुरआन प्रवचनाचेही आयोजन केले जाणार आहे . इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील कुरआनाच्या प्रती लोकांमध्ये मोफत वितरित करण्याचाही मानस असून विशेष करून इस्लाम संबंधी ज्यांच्या मनामध्ये काही प्रश्‍न असतील तर त्यांचे यथाशक्ती उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे . हे सर्व काम शांततामय वातावरणात केले जाणार आहे ते पुढे पत्रकारांना माहिती देत म्हणाले की कोरोना महामारीने भौतिकवादी लोकांचे डोळे उघडले आहेत. या स्थितीमुळे त्यांचे सध्याचे विश्‍वास आणि कार्यशैलीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. आणि या गोष्टीची जाणीव वाढली आहे की, जीवन फक्त संपत्ती गोळा करण्याचे नाव नाही केवळ भौतिक उद्देशांच्या परीपूर्तीचे नाव नाही. शेवटी विवेक आणि करूणेशिवाय, कुठलेही सुख नाही.असी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली