रोहित दादा विचार मंचचे प्रमुख तसेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित दादा पवार रविवारी शेंदुर्णीत

273

शेंदुर्णी तालुका जामनेर प्रतिनिधी  –  रोहित दादा विचार मंचचे प्रमुख तसेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार शेंदुर्णीला रविवारी दुपारी अडीच वाजता येणार आहे शेंदुर्णी येथील पाचोरा रोड वरील विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे भेट देऊन रुग्णांची विचारपूस व कार्यकर्त्यांच्या भेटी घाटी घेणार आहे.
आमदार रोहित पवार शेंदुर्णीला सागर गरुड यांच्या विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे दुपारी अडीच वाजता येणार आहेत. त्यावेळी रुग्णांची विचारपूस कोरोना काळात करुणा योद्ध्यांनी केलेली कामगिरी याबाबत माहिती घेणार आहे.सर्व प्रथम ते कजगाव ला येऊन अकरा वाजता तेथे विघ्नहर्ता हॉस्पिटलचे उद्घाटन करणार आहे. त्यानंतर बारा ते दोन वाजेपर्यंत पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल चे कामकाज पाहून कार्यकर्त्यांच्या व रोहित पवार विचार मंचच्या कार्यकर्त्यांची वार्तालाप करणार आहे. शेंदुर्णी नंतर पहुर मार्गे नेरी जात तेथे कार्यकर्त्यांची भेटी-गाठी घेणार आहे
पाचोरा कजगाव व शेंदुर्णीला होणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन विघ्नहर्ता हॉस्पिटल चे संचालक सागर गरुड व डॉ भूषण मगर यांनी केले आहे डॉ सागर गरुड यांच्या प्रयत्नामुळे पाचोरा कजगाव व शेंदुर्णी येथे अल्पदरात रुग्ण सेवा सुरू आहे.