खुलताबाद तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींचा निकाल जाहिर;तरुणांनी दिला दिग्गजांना धक्का

250

 

खुलताबाद / प्रतिनिधी

खुलताबाद तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींपैकी 25 ग्रामपंचायतींसाठीचे निवडणुक मतदान शुक्रवारी (ता.15) झाल्यानंतर सोमवारी (ता.18) या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, निवडणुक निर्वाचन अधिकारी संगीता सानप,तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी जाहीर केले.
खुलताबाद शहराबाहेरील म्हैसमाळ रोडवरील एका अध्यापक महाविद्यालयाच्या मल्टीपर्पज सभागृहात या मतमोजणीला प्रारंभ झाला,14 टेबल अन पाच फेरयाद्वारे अवघ्या तीन तासात या 25 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले.
या मतमोजणी वेळी म्हैसमाळ रोड ग्रामीण कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलुन गेला होता,पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त असल्याने कार्यकर्ते जल्लोष करतांनाही खबरदारी बाळगत होते.

खुलताबाद तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींचे नवनिर्वाचित सदस्य याप्रमाणे-

1) भडजी सदस्य- उत्तम मोरे, केसरबाई घोडके, सोनाली वाकळे,q ज्ञानेश्वर गवळी, बाबासाहेब वाकळे, निर्मला वाकळे, भानुदास जाधव, अश्विनी अक्कर, पुष्‍पाबाई होळकर.
2) पळसवाडी सदस्य – दगडू भेंडे, सोमीनाथ ठेंगडे, वंदना राठोड, सुरेखा पवार.
3) वेरूळ सदस्य – जितेंद्र हजारी, कुणाल दांडगे, ज्योती लोखंडे, रेखा ठाकरे, रखमाबाई बकाळ, कुसुमबाई मिसाळ, सिंधू खरे, अनिता पांडव, रिहाना शेख, विजय राठोड, चंदु राठोड, कलीबाई चव्हाण.
4) बोडखा सदस्य – अरुण गायकवाड, जाकिर शहा, शबाना शेख, कडूबा पवार, अशोक जाधव, द्वारकाबाई जाधव, अश्विनी काटकर, फरजाना बी पटेल, वैशाली शेळके.
5) सुलतानपूर सदस्य – रामलाल निंभोरे, शांताबाई मोरे, शहजान बी शेख, सुदाम सोनवणे, संजय मोरे, मिनाबाई चव्हाण अमरनाथ श्रीखंडे.
6) बाजार सावंगी सदस्य – कौशल्या नलावडे, पोपटराव काटकर, बबन पुंड, लक्ष्मीबाई नलावडे, अरुण गायकवाड, सुगंधाबाई काटकर, शांताबाई नलावडे, नागेश गायकवाड, आप्पाराव नलावडे, नानुभाई धुमाळ, कारभारी नलावडे.
7) झरी सदस्य -करणसिंह चांदवडे, रमेश धरम, लता झुरावत. कोकीळाबाई चांदवडे, विठ्ठल साळुंखे, उज्वला राऊत.
8) सोनखेडा सदस्य – शबाना शेख, राजेंद्र कासारे, लताबाई वाकळे, नवनाथ ठील्लारे, योगिता ठील्लारे.
9) खिर्डी सदस्य – ज्ञानेश्वर मतकर, सुशीला पांडव, रूपाली कृष्णा चव्हाण, छायाबाई घोडके, राधा दवंडे, कृष्णा दवंडे, नवनाथ वडे, अनिता वरकड.
10) गदाना सदस्य – जनार्धन वाहुळ, ज्योती कुकलारे, विठाबाई तुपे, कैलास बडुगे, काकासाहेब अधाने, सविता चव्हाण, राजू चव्हाण,
11) गोळेगाव सदस्य – उत्तम गायकवाड, अर्जुन व्यवहारे, ताराबाई आवटे, संतोष जोशी, संगीताबाई जिते, चंद्रकला जाधव, प्रकाश जाधव, रेखा काळे.
12) म्हैसमाळ सदस्य – गणेश मोठे, लता गिरी, माधुरी महेर, शिवाजी मालोदे, सुरेश पवार, सुनिता मालोदे, बाळू गायकवाड, चंद्रकला राठोड, शशिकला मालोदे.
13) टाकळी राजेराय सदस्य – हरिदास जाधव, कांताबाई जाधव, अफसर शेख, कुसुंबई हरणे, जुलेखा बी पटेल, विजय औटे, इरफान शेख, असेफा शेख, नसीर पटेल, वाजेरा बी इनामदार, नंदा दांडगे, गुलाब कुचे, माधुरी तांदळे.
14) गल्लेबोरगाव सदस्य – श्याम कर्डिले, मुक्ताबाई भागवत, रामदास चंद्रटिके, ताराबाई बुखार, मंदाबाई भागवत, तुकाराम हारदे, चित्र मरमट, लताबाई खोसरे, संतोष राजपूत, विशाल खोसरे, मीना शेवारे, संदीप शिरसाट, कलावती दुधारे.
15) पिंपरी सदस्य – लखनसिंग गोमलाडू, चंपावतीबाई बाहेर, सरदार खान पठाण, भागीरथाबाई बारगळ, शिल्पा जाधव, शकुंतलाबाई चव्हाण ताराबाई चुंगडे.
16) ताजनापुर सदस्य- संजय काळे, वैशाली काळे, अनिता, गणेश काळे, सारिकाबाई धुमाळ, शशिकला काळे, किशोर धनेधर, विनोद देशमुख, नेहाबाई काळे.
17) कनकशिळ सदस्य – संदीप निकम, काशीबाई निकम.
18) सराई सदस्य – अर्चना पवार, सविता नागे , विजय कचरू, योगिता आंबेकर, सोनाली नागे , आजिनाथ काळे, कल्पना काळे.
19) निरगुडी सदस्य – पांडू मधे, भारती काकस, पुंजाबा मेंगाळ, सुनील जाधव, जनाबाई मधे, शांताबाई उघडे, राणी दिपक, यशोदा राठोड.
20) कसाबखेडा सदस्य – नईम पटेल, रूपाली राहणे, सईदा बी शेख, रिजवान पठाण, असलम खान मंसूरी, भारती औट, अनिल राणे, ताराबाई जाधव, सवेरा शेख, अनिल ढिवरे, तनवीर पटेल , अनुराधा लाटे, अंबरसिंग जांगाळे, रोहिणी पवार.
21) धामणगाव सदस्य – विकास कापसे, दुर्गाबाई पाल्हाळ, मुक्ताबाई आघाडे, किरणकुमार बनकर, विलास राठोड, जिजाबाई मचावे, साईनाथ गायकवाड, बेबी जाधव, रंजना साळुंके.
22) खांडी पिंपळगाव सदस्य – भाऊसाहेब श्रीखंडे, मंगलबाई महालकर, सज्जनसिंग झाला, विठाबाई भालेराव, मनीषा महालकर, सुभाष भालेराव, कविता जोनवाळ,
23) वडोद बुद्रुक सदस्य – ऋषिकेश तुरे, दैवशाला चव्हाण, शिवकन्या चव्हाण , अमोल चव्हाण ,सुनिता चव्हाण, पद्मा देवकर, नाना बनकर.
24) कागजीपुरा सदस्य – अहमद शेख, नजरीना कुरेशी, अलिमुद्दिन जैनुद्दीन, अनिशा बेगम, शहनाज बेगम , रफिक शेख, शाहजहाँ शेख.
25) मावसाळा सदस्य – प्रभाकर घाटे, गंगाबाई काळे, नामदेव सोनवणे, मीना घाटे, प्रगती गवळी.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत निकाल जाहिर करण्यात आले.सभागृहात मतमोजणीचा निकाल ऐकन्यासाठी सकाळ पासूनच मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्तांनी अफाट गर्दी केली होती. व आपापल्या पँनलांचे कार्यकर्ते विजय होताच ग़ुलाल उधडून जल्लोष साजर करत होते.यामुळे म्हैसमाळ रोडवरील डॉ.जाकिर हुसैन महाविद्यालयावर यात्रा चे स्वरूप आले होते.