पाचोरा तहसिल कार्यालय येथे ग्रामीण पत्रकार संघटनेमार्फत भिमराव खैरे यांनी जनहितार्थ विविध मुद्द्यांसह निवेदन दिले

257

पाचोरा प्रतिनिधी शेरव जावीद – जळगाव जिल्ह्य़ातील पाचोरा तहसिल कार्यालय येथे ग्रामीण पत्रकार संघ या संघटनेमार्फत भिमराव खैरे विभागिय सचिव यांनी जनहितार्थ विविध मुद्द्यांसह निवेदन देण्यात आले

सदर निवेदनात शबरी आवास योजना व रमाई आवास योजना साठी त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच विधवा परितक्त्या निराधार जेष्ठ नागरिक यांना शासनामार्फत देण्यात येणारी पेन्शन वाढवून मिळावी.
पाचोरा तालुक्यातील महापुरुषांच्या पुतळांना संरक्षणासाठी सी सी टी वी कॅमेरे बसवावे व सुशोभीकरण करावे
महत्वाचे म्हणजे तालुक्यातील काळाबाजारात सर्रास विक्री होत असलेले रेशन चे धान्य या विषयी कडक कारवाई करावी. गौनखनिज चोरी विषयी कडक कारवाई करावी
गांजा, चरस, अफीम सारख्या नशेच्या आहारी युवा पीढी जात आहे. त्या साठी कडक पाऊल उचलावे व गोरगरीबांचे संसार उध्वस्त करणार्‍या सट्टा मटका, पत्ते, जुगार, सारखे अवैध धंदे 15 दिवसात बंद न केल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे..