कुणाल दांडगे यांनी गुरुकुलास बारा ऑक्सिमिटर व पाच थर्मल गन दिले भेट

237

खुलताबाद प्रतिनिधी – येथील गुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर मध्ये ७२ वा भारतीय प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला तर यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य कुणाल ( विकी ) दांडगे यांनी प्रशालेस बारा ऑक्सिमीटर व पाच थर्मलगन भेट स्वरूपात दिले कोरोनाचा प्रादुर्भाव बघता अगदी माफक विद्यार्थ्यांच्या सानिध्यात यावेळी प्रजासत्ताक दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लासुरस्टेशन येथील संस्था सदस्य मदनलाल पांडे तर ध्वजारोहक म्हणून डॉ प्रेमचंद पाटणी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष दिनेश गंगवाल , किरण गंगवाल , नरेंद्र गंगवाल, सौ. रेखा गंगवाल , सौ.राखी गंगवाल , सौ.मीना गंगवाल , निर्मलकुमार ठोळे , विपिन दोडल उपस्थित होते. प्रथमतः सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले प्रशालेचे क्रीडाशिक्षक संजय महाजन , आशिष कान्हेड यांच्या प्रमुख मार्गदर्शनात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख मान्यवरांना एनसीसीच्या परेडमध्ये मानवंदना दिली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाबचंद बोराळकर यांनी केले. प्रजासत्ताक दिनावर शिक्षक अरुण तपसी , संतोष जैन यांच्या मार्गदर्शनात भित्तीपत्रक तयार करण्यात आले. त्याचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षक राजकुमार नरखडे यांनी भारतीय संविधान व प्रजासत्ताकदिनाचे महत्व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य रेखा सुरेश ठाकरे , रखमाबाई नामदेव बकाल , कुसुमबाई प्रकाश मिसाळ , सिंधू जवाहरलाल खरे , अनिता साहेबराव पांडव , शेख रिहाना , विजय राठोड , हंसराज राठोड , जितेंद्र हजारी , कुणाल दांडगे , ज्योती लोखंडे , निर्मला सुलाने , मनीषा जंगाले , त्र्यंबक जोनवाल यांचा सत्कार करण्यात आला यांच्यासह पोलीस पाटील रमेश ढिवरे , महेंद्र जैन , भाग्यश्री नलावडे , शारदा सोळंके आदींचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे विश्वस्त व मार्गदर्शक स्वर्गीय पन्नालालजी गंगवाल यांच्या स्मरणार्थ नव्याने निर्माण करण्यात आलेल्या वाहन तळाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिनेश गंगवाल व त्यांच्या संपूर्ण परिवाराने स्वर्गीय पन्नालाल गंगवाल यांच्या स्मरणार्थ बृहत दान राशीची घोषणा केली. यावेळी प्रशालेचे शिक्षक दीपक जैन यांच्यातर्फे अल्पोपहार व जलपानाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र वाकळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शोभा देशमाने यांनी मानले.