शेंदुर्णीत विविध विकास कामांचे भूमिपूजन , पाच लक्ष क्षमतेच्या जलकुंभाचे भूमिपूजन

399

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – शेंदुर्णी नगरपंचायत च्या वतीने सोयगाव रोडवर जुन्या पाण्याच्या टाकीच्या शेजारी पाच लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे भूमिपूजन नगराध्यक्षा विजया खलसे यांनी केले.
येथे महिला दिना निमित्त व मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा करण्यात आला .शेंदुर्णी नगरी च्या प्रथम लोक नियुक्त महिला नगराध्यक्षा विजया खलसे यांच्या हस्ते पूजा-अर्चा करून पाच लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच विविध रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन, चौक सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल होते. प्रास्ताविकात मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी केले त्यात त्यांनी शेंदुर्णी च्या विकास कामाचा आढावा दिला दोन वर्षात शेंदुर्णी चा आमूलाग्र बदल होणार असल्याचे त्यांनी सविस्तर कथन केले. गोविंद अग्रवाल यांनी सांगितले की आता खऱ्या अर्थाने नगराचा सर्वांगीण विकास होत असून नागरिकांनी सहकार्य करावे. अमृत खलसे व उत्तम थोरात यांनी नगर पंचायतीत होत असलेल्या कामा बाबत समाधान व्यक्त केले.
या वेळी नगराध्यक्षा विजया खलसे, उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल ,गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, उत्तम थोरात मुख्याधिकारी साजिद पिंजारी, कडुबा माळी ,नारायण खकारे ,अतुल जहागिरदार, नगरसेविका भावना धीरज जैन, नगरसेवक शरद बारी ,शंकर बारी , संगीता बारी ,साधना बारी, पंडितराव जोहरे. प्रफुल पाटील.निलेश थोरात व इतर नगरसेवक पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.