करमाड पोलिसांनी व माणुसकी समुहाने दिला मनोरुग्ण 45 वर्षीय महिलेला दिला न्याय, मानव सेवा तीर्थ चोपडा येथे पुनर्वसनासाठी केले दाखल

365

अनाथ बेवारस मनोरुग्णांना कोण न्याय देणार महाराष्ट्र कुठे आहे सेंटर ?

सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेतर्फे मदतकार्य
लोहारा ( दिनेश चौधरी )
आपल्या घरातील स्त्री बाहेर गेली आणि घरी परत यायला तिला उशिर झाला की जीव कासाविस होतो.रात्री अपरात्री काही झालं तर? मात्र ती घरात सुखरूप आल्या नंतर आपली काळजी संपते.घरातल्या चार भिंतींच्या मर्यादेत ती सुरक्षित असते.पण अशाच असुरक्षित व धोक्याच्या कित्येक स्त्रिया रात्री भटकत असतात;ती कुणाची तरी आई, मुलगी,अथवा पत्नी, किंवा बहीण असेल.पण त्यांची वाट पाहणारं असं कुणीच नाही.अशा अनेक महिला ज्यांना त्यांच्या आपल्या लोकांनीच व समाजाने देखील सोडून दिलं आहे.कारण त्या आजारी आहेत मनोविकृत आहेत. करमाड ता. जि. औरंगाबाद या भागात काही दिवसांपासून मानसिक आजाराने ग्रस्त एक महिला फिरत असून,लोकांना दगड मारने,अंगावरचे कपडे फाडने ह्या मानसिक अवस्थेत आहेत.हि बाब पोलीस निरिक्षक संतोष खेतमाळसयांच्या लक्षात आली .त्यानी त्या मनोरुग्ण महिलेची चौकशी केली. असता ती आपल्या महाराष्ट्रातील नसून ती एक बेवारस निराधार महिला आहे हे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती देवुन त्यांच्या पुनर्वसनासाठी काही समाजिक संस्थेचे स्वयंसेवक काम करते का त्यात
सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि माणुसकी रुग्ण समूहा चे सामाजसेवक श्री सुमित पंडित यांना माहिती दिली, असता सुमित पंडित यांनी विविध आश्रमांची विचारपूस केली,त्यात वेले तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील आश्रम येथे नेण्याचे ठरवले,कारण असे कळले आहे की दुर्दैवाने औरंगाबाद येथे अश्या मनोरुग्ण महिलांसाठी पुनर्वसनाची काहीच व्यवस्था नाही.सामाजिक कार्यात पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस माणुसकी समुहाचे सुमित पंडित,पो उपनिरीक्षक एरंडे साहेब पोहे काँ संतोष पाटील,अंमलदार विजय जारवाल, नाईक सुनील गोरे महिला पोलीस अंमलदार भारती राठोड करमाड पोलीस स्टेशन संस्या चालक एन.आर.पाटील चोपडा,माणुसकी समुहाचे जळगाव जील्हाध्यक्ष गजानन क्षिरसागर, समाजसेविका सौ पुजा पंडित,
बाळुशेट भुतडा,बीलाल पठाण,नवनाथ बचाटे,नीलेश कुमार,आदिंनी मेहनत घेतली.
———————————————————————
एक सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणुन मनोरुग्ण महिलेला दिला न्याय
एक सामाजिक दायित्व व कर्तव्य स्वीकारणारे याचं उत्तर माणुसकी शिवाय दुसरं काय असेल.ती महिला मानसिक आजाराने पीडित आहेत.हा त्यांचा गुन्हा आहे का ?
समाजाने वाळीत टाकलेल्या ह्या महिलांवर शारीरिक आत्याचार होत नसतील का ? अमानुष लोकांच्या वासनेच्या शिकार झालेल्या ह्या महिलांपासून जन्माला आलेल्या अनाथ मुलांचा भार कोणी सांभाळावा
प्रश्न ह्या एका महिलांचाच नाही, तर अजून किती असतील.ज्या अशाच अबोध आपल्या देहाला बेसुध मिरवत असतील समाजातील वाईट नजरे सामोर.
मग यांच्यासाठी एक मायेचं आपुलकीचं घर आहे का ? यांना असच उकिरड्यावर ठेवायचे काय ? समाजाच दायित्व काहीच नाही का ? हे मनोरुग्ण देखील आधी सामान्य जीवन जगत होते. जीवनात संकट सांगुन येत नसतात.आपण आपल्या मर्यादा जर खरच वाढवल्या आणि मदतीचा हात सामाजिक संस्थाना लावला,जे अशा स्वरूपाचं काम करण्यास उभे होत आहेत.तेव्हा खऱ्या अर्थाने मनोरुग्णाचा मानसिकतेत स्थिरता येईल. आणि समाजाची खरी मानसिक विकृत वृत्ती नष्ट होईल.

—- संतोष खेतमाळस पोलीस नीरीक्षक , करमाड पोलीस स्टेशन