Home जळगाव पाचोरा व भडगाव शहरात ३ दिवस संपूर्ण लॉकडाऊन – प्रांताधिकारी मा.श्री. राजेंद्र...

पाचोरा व भडगाव शहरात ३ दिवस संपूर्ण लॉकडाऊन – प्रांताधिकारी मा.श्री. राजेंद्र कचरे

219

प्रतिनिधी पाचोरा – पाचोरा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज दिनांक १७ मार्च बुधवारी कोरोना बाधितांची संख्या ६५ आल्याने पाचोरा शहरात शुक्रवार, शनिवार, रविवार असे तिन दिवस सतत ३ दिवस पुर्णपणे म्हणजे शंभर टक्के लॉकडाऊन डाऊन करण्याचा निर्णय पाचोराचे प्रांताधिकारी मा.श्री. राजेंद्रजी कचरे साहेब यांनी नुकताच जाहीर केला आहे.
पाचोरा आणि भडगाव नगर परिषद हद्दीत दिनांक १९ मार्च ते २१ मार्च २०२१ या कालावधी मध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना कठोरपणे राबविता याव्यात यांकरिता उपविभागीय दंडाधिकारी पाचोरा यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना विशेष अहवाल सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने माननीय जिल्हा दंडाधिकारी यांनी पाचोरा आणि भडगाव नगरपरिषद हद्दीमध्ये फक्त शहरी भागांमध्ये दिनांक १९ मार्च ते २१ मार्च २०२१ या कालावधीमध्ये लॉक डाउन राबविण्यास मंजुरी दिलेली आहे. कृपया पाचोरा आणि भडगाव नगरपालिका हद्दीतील सर्व सन्माननीय नागरिक लोकप्रतिनिधी पत्रकार बांधव व्यवसायिक परिसरातील शेतकरी बांधव यांनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन पाचोराचे प्रांताधिकारी मा.श्री. राजेंद्रजी कचरे साहेब यांनी केले असून
या लॉकडाऊन मध्ये दूध खरेदी विक्री केंद्र, खाजगी व शासकीय वैद्यकीय स्थापना, औषध केंद्रे, आपत्ती व्यवस्थापनाशी निगडित अधिकारी-कर्मचारी तसेच दिनांक २१ मार्च २९२१ या दिवशी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जाणारे परीक्षार्थी तसेच या परीक्षेसाठी सेवा वर्ग अधिकारी कर्मचारी यांना वगळण्यात आले असून या अत्यावश्यक सेवा सुरु रहातील.

error: Content is protected !!