जळगाव एलसीबीकडून रस्तालुटीचा गुन्हा उघड

310

 

जळगाव प्रतिनिधी – साखर व्यापा-याची 7 लाख 90 हजार रुपयांची वसुली करुन परत जाणा-या कार चालकाची लुट झाल्याची घटना 7 मार्च रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील म्हसावद ते एरंडोल दरम्यान घडली होती. या लुटीप्रकरणी कारचालक नाना नथु पाटील यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला आहे,पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी आपली तपासाची सुत्रे फिरवत खब-यांसह तांत्रीक माहितीचा आधार घेत दिपक साहेबराव चव्हाण उर्फ डासमा-या आप्पा (रा.सामनेर ता.जि.जळगाव ह.मु.गिरड ता.भडगाव जि.जळगास) यास गिरड येथून ताब्यात घेतले. त्याने पोलिसी हिसका बघताच गुन्हयात चोरी केलेली मारोती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार (एमएच 02 इआर 5382) व रोख रुपये 40 हजार काढून दिले आहेत
या गुन्हयातील दुसरा आरोपी तुकाराम दिनकर पाटील उर्फ सोनु उर्फ मोघ्या (रा.सामनेर ता.जि.जळगाव ह.मु.बरखळा पठाणी, भोपाळ ,मध्यप्रदेश ) याचा शोध घेण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे सहकारी सहाय्यक फौजदार रा.का.पाटील, पो.हे.कॉ. विलास पाटील, सुधाकर अंभोरे, राहुल पाटील यांना रवाना केले आहे. दिपक साहेबराव चव्हाण उर्फ डासमा-या आप्पा रा.सामनेर ता.जि.जळगाव ह.मु.गिरड ता.भडगाव जि.जळगास यास गुन्हयाच्या पुढील तपास कामी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली,स.फौ.रा.का.पाटील, पो. हे. कॉ.अनिल इंगळे, विजयसिंग पाटील, विलास पाटील, सुधाकर अंभोरे, राहुल पाटील, नितील बावीस्कर, विजय शामराव पाटील,नंदलाल पाटील भगवान पाटील स,फौ,रमेश जाधव मुरलीधर बारी तसेच पो उपनिरीक्षक श्रि, रविंद गिरासे, स, फौ विजय पाटील नरेंद वारूळे यांनी सहभाग घेतला.