सौ.रिता चौधरी यांना पी.एच.डी.प्रदान

242

शेंदुर्णी ता.जामनेर
शेंदुर्णी येथील रहिवासी व सध्या डोंबिवली येथे राहत असलेले सेवानिवृत्त शिक्षक विक्रम त्र्यंबक गुजर यांची कन्या सौ.रिता समीर चौधरी यांनी पुणे विद्यापीठातुन नुकतीच मार्केटिंग मँनेजमेंट या विषयात पी.एच.डी.प्राप्त केली आहे.प्रा.डॉ. जयश्री भालेराव यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
सौ.रिता चौधरी या सध्या नाशिक येथील नवजीवन इंस्टीट्युट आँफ मँनेजमेंट या शिक्षण संस्थेमध्ये येथे सहयोगी प्राध्यापक म्हणुन कार्यरत आहेत. भुसावळ येथील नामवंत डॉ. के.डी.चौधरी यांच्या स्नुषा तर समीर चौधरी यांच्या पत्नी आहे.त्यांच्या यशाबद्दल शेंदुर्णी व परिसरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.