शेंदुर्णी येथे नगरपंचायत सफाई कामगारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी उपनगराध्यक्ष पतीच्या विरोधात गुन्हा दाखल

288

शेंदुर्णी तालुका जामनेर
नगरपंचायत सफाई कामगारांना जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्या प्रकरणी शेंदुर्णी नगरपंचायत उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल यांचे पती व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्या विरोधात पहूर पोलिस स्टेशन येथे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे पारस चौकातील राष्ट्रमाता जिजाऊ पतपेढी संस्थेसमोर फिर्यादी अरुण पंढरी सकट वय २९ नगरपंचायत सफाई कामगार याल जातीवाचक शिवीगाळ केली याप्रकरणी पहूर पोलिस स्टेशन मध्ये अरुण पंढरी सकट याने भादवि कलम 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पाचोरा भरत काकडे हे करीत आहे.