रासेयो एककाच्या वतीने कोरोना जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन

199

प्रतिनिधी शेंदुर्णी ता.जामनेर …
माझे कुटुंब माझी जबाबदारी, चला साकारूया कोरोना जनजागृतीची ई-वारी. कोविड-19 महामारीमुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्र फार मोठया प्रमाणात प्रभावित झालेले आहे. आजच्या या कोविडच्या गंभीर परिस्थितीत शाळा, महाविद्यालये गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. तसेच कोविडच्या गंभीर परिस्थितीवर जनजागृती व समाजप्रबोधन होण ही सुद्धा काळाची गरज आहे. याच पार्श्वंभुमीवर तरुणांना व्यक्त होण्यासाठी संधी मिळावी या दृष्टीने,
धी शेंदूर्णी सेकं. एज्यु. को-ऑफ सोसायटी लि.शेंदूर्णी संचलित अ.र.भा.गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो एककाच्या वतीने व ग्लोबल युवा फाउंडेशन, मोराड यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण 03 स्पर्धांचे आभासी (virtual) पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा खालील प्रमाणे:
1) कोरोना जनजागृतीपर व्हिडिओ स्पर्धा.
2) पोस्टर (डिजिटल किंवा हँडमेड ‘घोषवाक्यासह’) स्पर्धा.
3) निबंध स्पर्धा.
आयोजित केलेल्या या स्पर्धेतून या टाळेबंदीच्या काळात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल व त्यांच्या अभिव्यक्ती सादरीकरणाच्या माध्यमातून कोरोना जनजागृतीचा हेतु साध्य होण्यास मोलाचा हातभार लागेल. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामिण भागातील धडपडणार्‍या तरुणांना चांगली संधी उपलब्ध होईल.
या स्पर्धेत बक्षीस व ई-प्रमाणपत्र विजेत्यांना देण्यात येणार आहे. व्हिडिओ,पोस्टर व निबंध गटातून विजेत्यांना खलील प्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहेत.
प्रथम-1001 रु
द्वितीय-701 रु
तृतीय-301 रु
या स्पर्धेसाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही तसेच ही स्पर्धा उच्चमाध्यमिक, पदवी व पदव्युत्तर वयोगटापर्यंत सगळ्यांना खुली आहे.
या स्पर्धेत सर्व स्पर्धकांना सहभाग ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.
या स्पर्धेसाठी धी शेंदूर्णी सेकं. एज्यु. को-ऑफ सोसायटी लि.शेंदूर्णी चे अध्यक्ष मा.दादासाहेब संजयजी गरुड, संस्थेचे सचिव मा.सतीश चंद्रजी काशीद यांनी शुभेच्छा दिल्या असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल असे प्रतिपादन केले.
या स्पर्धेची नोंदणी गुगल फॉर्म द्वारे करण्यात येत असून जास्तीत जास्त होतकरू विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या कला गुणांना वाव द्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांनी केले आहे.गुगल फॉर्म लिंक ही माहिती पत्रिकेतील नियमावलीसह दि.09/05/2021 रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पर्धकांना उपलब्ध होणार आहे. सहभागी स्पर्धकांना पुढील सर्व सूचना व्हाट्स अप गृप ला जॉईन झाल्यानंतर देण्यात येणार आहेत याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी. या स्पर्धसाठी असणारी बक्षिसे महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनींनी स्पॉन्सर केलेली आहेत.जेणे करून होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा.या स्पर्धेच्या आयोजनासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी, रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.वसंत एन.पतंगे,रासेयो महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सुजाता सी.पाटील,रासेयो स्वयंसेवक किरण उर्फ माऊली सुरवाडे,सागर तडवी,विनय गरुड,व्यंकटेश उपाध्ये,सचिन कुंभार,देवेंद्र बारी,विशाल जिरे,सौरभ कापसे व राहुल पाटील परिश्रम घेत आहेत.