स्वयंसेवक रविंद्र बोरसे, किरण सुरवाडे व सागर तडवी यांचे लसीकरणाच्या मोहीमेत सहकार्य

181

लसीकरणात रासेयो एककाची मदत

प्रतिनिधी शेंदुर्णी –  शासनाने कोरोना महामारी नियंत्रित करण्यासाठी लसीकरणाच्या कामास वेग दिलेला आहे. यात वेगवेगळ्या संस्था,स्वयंसेवक हे मदतीस पुढे येत आहेत. याच पार्श्वभुमीवर अ.र.भा.गरुड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने स्वयंसेवक रविंद्र रमेश बोरसे,किरण उर्फ माऊली सुरवाडे व सागर बशारत तडवी यांनी समाजभान जपत लसीकरणाच्या मोहीम सहकार्य करून हातभार लावला.त्यांनी लसीकरणाच्या वेळो डेटा एन्ट्री व इतर कामे केलीत.त्यांनी डॉ.राहुल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रकारे काळजी घेत म्हणजेच मास्क व सॅनिटायझर याचा वापर करून मदतीचे कार्य केले.याआधी सुद्धा कोरोना काळात रासेयो स्वयंसेवकांनी विविध सक्रिय उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे.या कार्यासाठी त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.