खुलताबादेत एका पोलिस पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

242

 

खुलताबाद : शहरातील पोलीस कॉलनीत रहात असलेल्या एका पोलीस कर्मचारी प्रभुदास सुंदरलाल म्हस्के यांनी आज दि.१६ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण खुलताबाद पोलिस ठाण्यातील कर्मचारी व नागरिक हळहळ व्यक्त करित आहे.म्हस्के यांनी खुलताबाद येथील पोलीस कॉलनी येथे आपल्या राहते घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असुन खुलताबाद पोलीस स्टेशन ला आकस्मित मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.मृत्युचा कारण अद्याप ही स्पष्ट झाला नाही.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे व कर्मचारी करत आहे.