लाच घेताना हवालदार एसीबीच्या जाळ्यात

271

 

पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा तालुका येथील बैलगाडीसंदर्भात पिंपळगाव हरेश्वर पोलीस असलेल्या तक्रारीच्या निवारणासाठी ४ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर येथील पोलीस हवालदाराला पाचोरा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना मंगळवारी घडली.तक्रारदार शेतकऱ्याने वर्षभरापूर्वी बैलगाडी भाड्याने दिल्यानंतर संबंधिताने ती परत दिली नाही. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांत तक्रार दाखल होती. मात्र, या तक्रारदारावरच गुन्हा दाखल झाल्यानंतर शेतकऱ्याने बैलगाडी परत मिळवून देण्यासाठी पोलीस हवालदार राकेश खोंडे यांनी पाच हजारांची लाच मागितली. मात्र, तक्रारदाराकडे चार हजार असल्याने तडजोड करून रक्कम देण्याचे ठरले तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी ठाण्यात तक्रार करून मंगळवारी जळगाव येथील पथकाने सापळा रचला.पाचोरा येथील जारगाव चौफुलीवर एका चहाच्या टपरीवर चहावाल्याकडे रक्कम जमा करीत असताना पोलीस कॉन्स्टेबल राकेश खोंडे चहावाल्यास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले व जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक शशिकांत पाटील, निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश सिंग पाटील, सहायक उपनिरीक्षक सुरेश पाटील, पो. कॉ. अशोक अहिरे, बाळू मराठे, महेश सोमवंशी, राकेश दुसाने, सचिन चाटे, रमेश ठाकूर यांच्या पथकाने यशस्वी सापळा रचून लाचखोर पोलिसास रंगेहाथ पकडले आहे.