कुत्र्यांच्या हल्ल्यात मेणगाव येथे 150 कोंबडी ठार.70 हजाराचे नुकसान, तरुण शेतकरी हवालदिल.

384

 

दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी ) जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथून जवळच असलेल्या मेणगाव येथे आज दि.22 रोजी सकाळी ठीक 4 वाजेच्या दरम्यान गावातील कुत्र्यांनी येथील तरुण शेतकरी विनोद भास्कर चौधरी यांच्या पाळीव कोंबडी फॉर्म वर अचानक हल्ला चढवून पॅक बंद खोलीत प्रवेश करून जवळपास 150/00कोंबडी ठार केली आहे, विनोद चौधरी हे सकाळी 6 वाजेच्या दरम्यान तिथे गेले असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. या घटनेमुळे सदर शेतकऱ्याचे जवळपास सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
गावातील या मोकाट कुत्र्यांनी मागील वर्षीही गावातील गायी,बैल,गोऱ्हे, म्हशी यावर हल्ले करून त्यांचा फडशा पडला होता.त्यावेळी गावातील 8 ते 10 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्या वेळीच या मोकाट कुत्र्यांना आवर घातला असता तर आज या तरुण शेतकऱ्याचे। नुकसान झाले नसते, भविष्यात या मोकाट कुत्र्यांपासून गावातील लहान मुलांना धोका होऊ शकतो, विशेषतः ही कुत्रे प्लॉट एरियात जास्त आहे. आणि या भागात बऱ्याच शेतकऱ्यांचे पशुधन पण आहे.
तरी मेणगाव ग्रामपंचायतीने या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष द्यावे, व या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.